adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी. महाजन इंग्लिश मीडियम स्कूल, यावल येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी. महाजन इंग्लिश मीडियम स्कूल, यावल येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा   भरत कोळी यावल (संपादक -:- हेमका...

व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी. महाजन इंग्लिश मीडियम स्कूल, यावल येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा  


भरत कोळी यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल, दि. २८ फेब्रुवारी २०२६ — जे. टी. महाजन इंग्लिश मीडियम स्कूल, यावल येथे राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विज्ञानाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण करणे व वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्षा सौ. रंजना महाजन मॅडम यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी इंग्लिश मीडियमच्या प्राचार्या श्रीमती दिपाली धांडे मॅडम उपस्थित होत्या. तसेच सुपरवायझर सौ. गौरी भीरुड मॅडम, श्रीमती राजश्री लोखंडे मॅडम यांच्यासह इतर शिक्षकवृंदांची उपस्थिती लाभली. इयत्ता आठवी सेमी व इयत्ता आठवी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान चर्चासत्रात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. “प्लास्टिक : हार्मफुल व युजफुल इफेक्ट्स” या विषयावर विद्यार्थ्यांनी सखोल चर्चा करत प्लास्टिकच्या वापराचे फायदे-तोटे, पर्यावरणावर होणारे परिणाम आणि त्यावरील उपाययोजना याबाबत आपली मते मांडली. या चर्चेत समर्थ कासार, सुचिता फेगडे, लावण्या नाफडे, हेमांगी पाटील, कृती कार्तिकी महाजन, पायल राणे, आर्या पाटील, भूमिका पाटील, वैष्णवी गडे, अंकिता गायकवाड, आर्या वाणी, वेदिका पाटील, कल्याणी महाजन, भाविका पाटील, पूर्वा पाटील, कार्तिकी भारुड आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी आकर्षक व उपयुक्त सायन्स मॉडेल सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. प्रत्येक मॉडेलमागील संकल्पना विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने समजावून सांगितली. त्यामुळे विज्ञान विषयाबद्दल विद्यार्थ्यांची आवड व तयारी स्पष्टपणे दिसून आली. कार्यक्रमादरम्यान प्राचार्या दिपाली धांडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन मनीषा पाटील मॅडम यांनी प्रभावीपणे केले. दिपाली जंगली मॅडम व हर्षाली बारी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानविषयक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कविता पाटील मॅडम यांनी केले. एकूणच राष्ट्रीय विज्ञान दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

No comments