adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर पोलीस स्टेशन हद्दीतील हिंगोणा येथे किरकोळ वादातून तरुणाचा खून परिसरात खळबळ

 फैजपूर पोलीस स्टेशन हद्दीतील हिंगोणा येथे किरकोळ वादातून तरुणाचा खून  परिसरात खळबळ  इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर...

 फैजपूर पोलीस स्टेशन हद्दीतील हिंगोणा येथे किरकोळ वादातून तरुणाचा खून  परिसरात खळबळ 


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर  येथून जवळ असलेल्या हिंगोणा येथे किरकोळ वादातून एका १९ वर्षीय तरुणाचा खून  झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी 11:30 वाजता  घडली  परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र जवळ ही घटना घडली. मृत्यू  तरुणाचे नाव प्रथमेश मुकेश महाले (वय १९) असे असून, तो एकुलता एक होता किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या प्रथमेशचा मृत्यू झाला.

या घटनेत रीना मोहित गजरे (वय १९), मोहित राजेंद्र गजरे (वय ३०) आणि निखिल राजेंद्र गजरे (वय २६) हे तिघेही चाकूच्या वारात जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणातील संशयित आरोपी गौरव जाधव (रा. खर्डी, हल्ली मुक्काम हिंगोणा) याचे नाव समोर आले आहे. घटनेनंतर आरोपी फरार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. 

No comments