चोपडा तालुका पोलिस पाटील संघाच्या अध्यक्षपदी नंदलाल बाविस्कर बिनविरोध चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा तालुका पोलिस पाटी...
चोपडा तालुका पोलिस पाटील संघाच्या अध्यक्षपदी नंदलाल बाविस्कर बिनविरोध
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुका पोलिस पाटील संघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये तालुक्यातील वडगाव सीम येथील पोलीस पाटील नंदलाल रावसाहेब बाविस्कर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. संघाच्या उपाध्यक्षपदी बोर अजंटी येथील पोलीस पाटील पुष्पा सुलताने यांची निवड करण्यात आली असून, घाडवेल येथील भागवत दगडू पाटील यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीनंतर ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश टाक यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी संघाकडून प्रशासन व गावपातळीवरील समन्वय अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी अशोक कोळी (घाडवेल) यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे कौतुक करताना, “पोलीस पाटील हे शासन व जनतेमधील महत्त्वाचा दुवा असून संघाच्या माध्यमातून गावागावातील प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील,” असे मत व्यक्त केले. कार्यक्रमास तालुक्यातील विविध गावांतील पोलीस पाटील, ग्रामस्थ तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित अध्यक्ष नंदलाल बाविस्कर यांनी सर्वांचे आभार मानत संघाच्या माध्यमातून सर्व पोलीस पाटील एकजुटीने काम करतील, असा विश्वास व्यक्त केला.


No comments