adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वै. जगन्नाथ महाराज जयंतीनिमित्त दातृत्वाचा सन्मान; अंजाळे येथे शकुंतला पाटील व सुमन राणे यांचा गौरव

वै. जगन्नाथ महाराज जयंतीनिमित्त दातृत्वाचा सन्मान; अंजाळे येथे शकुंतला पाटील व सुमन राणे यांचा गौरव  इदू पिंजारी (फैजपूर) (संपादक -:- हेमकां...

वै. जगन्नाथ महाराज जयंतीनिमित्त दातृत्वाचा सन्मान; अंजाळे येथे शकुंतला पाटील व सुमन राणे यांचा गौरव 


इदू पिंजारी (फैजपूर)

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अंजाळे येथे साजऱ्या झालेल्या वै. जगन्नाथ महाराज जयंती उत्सवाच्या निमित्ताने समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या दोन महिला दानशूर व्यक्तींचा यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात श्रीमती शकुंतला मनोहर पाटील व सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती सुमन बळीराम राणे यांचा विशेष गौरव करण्यात आला.
अंजाळे येथील मूळ रहिवासी असलेल्या श्रीमती शकुंतला मनोहर पाटील यांनी आपले पती कै. मनोहर तुकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ वै. जगन्नाथ महाराज मंदिरालगत दोन लाख एकवीस हजार रुपये खर्चून एक खोली बांधून दिली. त्यांच्या या सामाजिक व धार्मिक कार्याबद्दल उपस्थितांनी विशेष प्रशंसा केली.
तसेच, विवरा बुद्रुक येथील मूळ रहिवासी व सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती सुमन बळीराम राणे यांनी आदिशक्ती मुक्ताबाई कोथळी येथील वै. जगन्नाथ महाराज मठासाठी दोन लाख पन्नास हजार रुपये खर्चून खोली बांधकामासाठी देणगी दिली. शिक्षण क्षेत्रासोबतच सामाजिक कार्यातही त्यांचे योगदान प्रेरणादायी ठरले आहे.
या दोन्ही मान्यवरांचा सत्कार गादीपती धनराज महाराज यांच्या हस्ते, सौ. करिष्मा पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी शाल, श्रीफळ व वै. जगन्नाथ महाराजांची प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी उपस्थित भाविक, ग्रामस्थ व मान्यवरांनी दातृत्वातून समाजाला दिशा देणाऱ्या या दोन्ही महिलांचे अभिनंदन करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

No comments