adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा नगर परिषद चा आगळावेगळा पर्यावरणपूरक पाककला स्पर्धेचा भव्य बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

चोपडा नगर परिषद चा आगळावेगळा पर्यावरणपूरक पाककला स्पर्धेचा भव्य बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गाय...

चोपडा नगर परिषद चा आगळावेगळा पर्यावरणपूरक पाककला स्पर्धेचा भव्य बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा नगर परिषदेमार्फत नगराध्यक्षा नम्रता पाटील व मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्या संकल्पनेतून माझी वसुंधरा अभियान 6.0 व स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत प्रथमच आगळावेगळा अन्नपूर्णा महोत्सव व पर्यावरणपूरक पाककला स्पर्धा दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी आक्कासो शरदचंद्रिका सुरेश पाटील नाट्यगृह येथे सायंकाळी 4.00 ते रात्री 10.00 वाजेपर्यंत माजी आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला होता.

या स्पर्धेत एकूण 65 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धकांनी सादर केलेल्या पदार्थांची चव तसेच पर्यावरणपूरक सजावट हे प्रेक्षकांचे प्रमुख आकर्षण ठरले. परीक्षक म्हणून डॉ. धनश्री महाजन, महिला व बालकल्याण अधिकारी श्रीमती पुनम ठाकरे तसेच अंतर्गत लेखापरीक्षक भारती पाटील यांनी जबाबदारी पार पाडली. माजी आमदार सौ. लताताई सोनवणे, नगराध्यक्षा सौ. नम्रता पाटील, मुख्याधिकारी श्री. रामनिवास झंवर व सर्व सन्माननीय नगरसेविकांनी स्पर्धकांच्या पदार्थांची पाहणी करून त्यांचे कौतुक केले होते.

त्या अनुषंगाने दि. 18/02/2026 रोजी नगरपरिषदेच्या छ. शिवाजी महाराज सभागृह येथे पर्यावरणपूरक पाककला स्पर्धेचा भव्य बक्षीस वितरण समारंभ पार पडला. मा. नगराध्यक्षा सौ. नम्रता पाटील व मा. मुख्याधिकारी श्री. रामनिवास झंवर यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

या स्पर्धेत नाविन्यपूर्ण, पर्यावरणपूरक व आरोग्यदायी पाककलेद्वारे उत्कृष्ट पदार्थ सादर करणाऱ्या महिलांना “अन्नपूर्णा” म्हणून सन्मानित करण्यात आले. पहिल्या पाच विजेत्या महिलांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व ट्रॉफी प्रदान करण्यात आली, तर उर्वरित पाच महिलांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात आली.

स्पर्धेतील विजेत्यांमध्ये प्रमिला छगन बडगुजर, रंजना विजय चौधरी, रुपाली पवन पाटील, किरण आनंदा चौधरी, अनिता संतोष पारधी, सुनैना झंवर, कविता पाटील, वर्षाराणी गायकवाड, वर्षा सोनवणे, हर्षदा धनगर व सपना लाड यांचा समावेश आहे. आयोजित भव्य बक्षीस वितरण समारंभात सर्व पात्र स्पर्धकांचा उत्साहपूर्ण वातावरणात गौरव करण्यात आला. कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला. यावेळी स्पर्धक महिलांनी नगरपरिषदेकडून महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.

कार्यक्रमादरम्यान मा. नगराध्यक्षा सौ. नम्रता पाटील यांनी स्पर्धकांच्या मेहनतीचे कौतुक करून अशा उपक्रमांमुळे महिलांना अधिक प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी महिलांनी विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करावे व स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करावे, असे आवाहन केले.

तसेच स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत मा. नगराध्यक्षा सौ. नम्रता पाटील यांच्या वतीने नगरपरिषदेच्या महिला सफाई कर्मचाऱ्यांना सन्मान म्हणून साडी वाटप करण्यात आले. महिला कर्मचाऱ्यांनी नगरपरिषदेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमासाठी स्वच्छता निरीक्षक श्रीमती दिपाली साळुंके यांनी विशेष परिश्रम घेतले, तर कर निरीक्षक श्री. संदीप गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम प्रसंगी उपमुख्याधिकारी श्री. संजय मिसर, स्वच्छता निरीक्षक वसंत राठोड, स्वच्छता निरीक्षक जयेश भोंगे, विद्युत अभियंता प्रमोद पाटील, शहर समन्वयक श्री. स्वप्निल धनगर आदी उपस्थित होते.

No comments