adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अवैध सावकारीवर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा; तक्रारी तातडीने निकाली काढण्याचे आदेश

 अवैध सावकारीवर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा; तक्रारी तातडीने निकाली काढण्याचे आदेश  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्...

 अवैध सावकारीवर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा; तक्रारी तातडीने निकाली काढण्याचे आदेश 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर:-जिल्ह्यात वाढत्या अवैध सावकारीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली असून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत. शेतकरी, व्यावसायिक व सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ अंतर्गत गठीत त्रिसदस्यीय समितीची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मंगेश सुरवसे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले की, अवैध सावकारांविरोधातील प्रत्येक तक्रारीची सखोल चौकशी करून संबंधितांना नोटीस पोहोच झाल्याची खात्री करावी आणि गुणवत्तेच्या आधारे निर्णय घ्यावेत. पीडित शेतकरी व नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता पुढे येऊन तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.गरजू नागरिक, व्यावसायिक व शेतकऱ्यांनी अवैध सावकारांकडून कर्ज घेण्याचे टाळावे. सहकार विभागाकडून परवाना प्राप्त सावकारांकडूनच कर्ज घ्यावे, जेणेकरून अवैध सावकारीला पायबंद बसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जादा व्याज आकारून त्रास दिला जात असल्यास सहकार विभागाकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहन करण्यात आले.

जिल्ह्यात अवैध सावकारी करणाऱ्या २१ सावकारांविरोधात संबंधित तालुका पोलीस ठाण्यांमध्ये अधिनियमांतर्गत २० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच १९ अपील प्रकरणांमध्ये २५ हेक्टर १५.५ आर जमीन व २ हजार २०० चौ.फुट बांधकाम विविध शेतकऱ्यांना परत मिळवून देण्याबाबत आदेश पारित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.शासनाने परवानाधारक सावकारांसाठी व्याजदर निश्चित केले आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांना तारण कर्जासाठी ९ टक्के व विनातारण कर्जासाठी १२ टक्के; तर बिगरशेतकऱ्यांना तारण कर्जासाठी १५ टक्के व विनातारण कर्जासाठी १८ टक्के व्याजदर लागू असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिली. जिल्हा प्रशासनाच्या या कारवाईमुळे अवैध सावकारीला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून पीडितांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

No comments