adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ब्युटी पार्लर माझा जीव होता, तळहातावर सुसाईड नोट लिहून नातेपुतेत नवविवाहितेची आत्महत्या, पती,दिर,सासू,सासरा यांच्यावर गुन्हा दाखल

  ब्युटी पार्लर माझा जीव होता, तळहातावर सुसाईड नोट लिहून नातेपुतेत नवविवाहितेची आत्महत्या, पती,दिर,सासू,सासरा यांच्यावर गुन्हा दाखल  संभाजी ...

 ब्युटी पार्लर माझा जीव होता, तळहातावर सुसाईड नोट लिहून नातेपुतेत नवविवाहितेची आत्महत्या, पती,दिर,सासू,सासरा यांच्यावर गुन्हा दाखल 


संभाजी पुरीगोसावी (सोलापूर जिल्हा) प्रतिनिधी. 

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

सोलापूर जिल्ह्यातून नातेपुते पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून एक दुर्दैवी बातमी नुकतीच समोर आली आहे. यामध्ये सासरकडील मंडळींकडून शारीरिक मानसिक त्रास होत असल्याने 22 वर्षीय नवविवाहितेने तरुणीने राहत्या घरी गळफास घेवुन आपले जीवन संपविले आहे. पायल शशिकांत रणदिवे (रा. खुळेवाडी ता. माळशिरस) असे या नवविवाहितेचे नाव आहे. ब्युटी पार्लर बंद करण्यासाठी सासरकडील लोकांकडून त्रास होत होता, असे तिने मृत्यूपूर्वी आपल्या तळहातावरील सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. याप्रकरणी वालचंद नगर पोलिसांनी पती शशिकांत मारुती रणदिवे, सासू छाया मारुती रणदिवे, सासरा मारुती दामू रणदिवे, यांना अटक करण्यात आले आहे. तर दिर कैलास मारुती रणदिवे याचा पोलीस शोध घेत आहेत. 


गुन्हा दाखल करण्यापूर्वी नातेवाईकांनी पायलचा मृतदेह नातेपुते पोलीस ठाण्यात आणला गुन्हा दाखल झाल्यानंतर तिच्या माहेरच्यांनी तिचा मृतदेह घरी नेला. याबाबत अंकुश रामचंद्र लोंढे (रा. बाबरीपुल महाळुंग ता. माळशिरस) यांनी फिर्याद दिली आहे. पायलच्या शरीरांवर मारहाणीच्या खुणा आहेत. त्यामुळे ही आत्महत्या नाही तर ही हत्या असल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे. पायलने आपल्या तळहातावर सुसाईड नोटमध्ये पायल ने मृत्यूपूर्वी हसू झालं ग माझं, माझं पार्लर बंद केलं, जीव होता तो माझा... स्वप्न होतं ग... आजपर्यंत शांत बसले. पण आता नाही चांगल्या आई-बापाची लेक आहे. म्हणून निघून पण नाही गेले. माझ्यामुळे त्रास झाला त्यासाठी मी माफी मागते. सॉरी. पायलच्या आत्महत्येमुळे नातेपुते परिसरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर करीत आहेत. मात्र या प्रकरणात आणखीन कोणती माहिती समोर येणार याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

No comments