adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल येथील मॉडर्न इंग्लिश मेडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

  यावल येथील मॉडर्न इंग्लिश मेडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न   भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  यावल येथील मॉडर...

 यावल येथील मॉडर्न इंग्लिश मेडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न  


भरत कोळी यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन हा सोहळा अतिशय आनंदात पार पडला. हा सोहळा यावल येथील पद्मावती लॉन्स येथे आयोजित करण्यात आला होता.

 कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून API यावल पोलीस स्टेशन अजय वाढवे सर, जिल्हा परिषद गट नेता प्रभाकर अप्पा नारायण सोनवणे,सरपंच परिषद अध्यक्ष वाढोदा संदीप भैय्या सोनवणे,भाजपा यावल तालुका  अध्यक्ष सागर भाऊ कोळी बँक मॅनेजर यावल सचिन चौधरी सर, केंद्रीय मनावधिकार संघटना मो. सलीम पिंजारी सर, संस्थाध्यक्ष निताताई गजरे मॅडम, सेक्रेटरी सौ मायाताई गजरे मॅडम, उपसंस्थाध्यक्ष भूषण नगरे सर, सौ दिक्षा गजरे मॅडम, श्री चंद्रकांत कोळी सर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

 तसेच सर्व मान्यवरांचे शाल आणि बुके देऊन स्वागत करण्यात आले.

"स्नेहसंमेलन हा केवळ एक मनोरंजनाचा कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारे एक हक्काचे व्यासपीठ आहे. हा क्षण आपल्या सर्वांच्या आठवणींचा आणि आनंदाचा एक अविस्मरणीय ठेवा असतो," असे प्रतिपादन मान्यवरांनी केले.

सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या कलेने गावकऱ्यांची मने जिंकली. यामध्ये शिव तांडव ​गोंधळ, कोळी नृत्य, काश्मीर नृत्य, सांबलपूरी नृत्य,देशभक्तीपर गीते व समूह नृत्य,वेस्टर्न व लोकनृत्य सादर केले.

 विद्यार्थ्यांनी शाळेबद्दल भाषण देऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभाग नोंदविला.सुमारे 300 विद्यार्थ्यांनी एकत्र‎ येऊन हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला.‎ 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ जयश्री चौधरी मॅडम यांनी केले, सूत्रसंचालन मंगला पाटील यांनी तर आभार प्रदर्शन संस्थाध्यक्ष निताताई गजरे मॅडम यांनी मानले.कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि‎ आनंदाचे वातावरण होते आणि शिक्षकांनी घेतलेल्या‎ मेहनतीचे प्रदर्शन या भव्य सोहळ्यातून दिसून आले.विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. 

 याप्रसंगी प्रमुख पाहुणे,संस्थाध्यक्ष निताताई गजरे मॅडम,मुख्याध्यापिका सौ जयश्री चौधरी मॅडम, तसेच शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments