ट्रेसर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्षपदी व्यंकटेश हालिंगे; सरचिटणीस सिद्धार्थ पवार तर कोषाध्यक्ष यशवंत जडे चोपडा : प्रतिनिधी (संपादक -:- हेम...
ट्रेसर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्षपदी व्यंकटेश हालिंगे; सरचिटणीस सिद्धार्थ पवार तर कोषाध्यक्ष यशवंत जडे
चोपडा : प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
कृषी विभागातील अनुरेखक संवर्गाच्या ट्रेसर्स असोसिएशन (मृ. सं.) महाराष्ट्र राज्य संघटनेचे १२ वे व सुवर्णमहोत्सवी राज्य अधिवेशन परभणी येथे पार पडले. या अधिवेशनात केंद्रीय कार्यकारिणीची एकमताने निवड जाहीर करण्यात आली.
राज्याच्या अध्यक्षपदी लातूर विभागाचे व्यंकटेश हालिंगे, सरचिटणीसपदी ठाणे विभागाचे सिद्धार्थ पवार तर कोषाध्यक्षपदी नाशिक विभागाचे यशवंत जडे यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा संघटनेचे कायदेशीर सल्लागार ॲड. चंदूलाल सदाशिव शहा यांनी या निवडी जाहीर केल्या.
राज्य उपाध्यक्ष (कार्यकारिणी सदस्य)
लातूर – नंदकुमार परांडकर
कोल्हापूर – श्यामराव जोशी
नागपूर – राजेंद्र ठाकरे
अमरावती – अनिल खंडारे
पुणे – गजानन शेलार
छत्रपती संभाजीनगर – मनोहरराव निगवेकर
महिला प्रतिनिधी – जयश्री साळवी भिसे
विभागीय सचिव
लातूर – प्रमोद रावके
कोल्हापूर – बाळासाहेब ठोंबरे
नागपूर – अभय चिखले
अमरावती – राजेश बनचरे
पुणे – सौ. वैशाली साबळे
नाशिक – वाय. डी. चव्हाण
ठाणे – सुनील नेतकर
छत्रपती संभाजीनगर – पद्माकर महामुनी
तसेच संघटनेच्या कायदेशीर अडचणींच्या निवारणासाठी धुळे येथील अनुरेखक ॲड. सी. एस. शहा यांची तहहयात कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून अध्यक्ष व्यंकटेश हालिंगे यांनी शाल, पुष्पहार व स्मरणचिन्ह देऊन अभिनंदन केले व भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. अधिवेशनाचे मुख्य संयोजक तथा माजी अध्यक्ष अंबादास क्षीरसागर (परभणी) यांच्यासह विविध विभागांतील माजी पदाधिकाऱ्यांनीही नव्या कार्यकारिणीचे अभिनंदन केले.
राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे संघटनेला नवे नेतृत्व लाभले असून अनुरेखक संवर्गाच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

No comments