लातूरमध्ये खाद्यतेल उद्योगावर आयकर धाडीचा परिणाम; शेतकरी अडचणीत, ग्राहकांच्या खिशाला कात्री. लातूर जि. प्र. (उत्तम माने) (संपादक -:- हेमक...
लातूरमध्ये खाद्यतेल उद्योगावर आयकर धाडीचा परिणाम; शेतकरी अडचणीत, ग्राहकांच्या खिशाला कात्री.
लातूर जि. प्र. (उत्तम माने)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
लातूर,:- लातूरमधील खाद्यतेल उद्योगावर प्राप्तिकर विभागाने अलीकडेच धाड टाकून आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू केली आहे. या कारवाईनंतर संबंधित उद्योगाने तात्पुरते कामकाज बंद केल्याने स्थानिक बाजारपेठ, शेतकरी आणि ग्राहक यांच्यावर त्याचे परिणाम दिसू लागले आहेत.या दोन दिवसात लातूरमधील या खाद्यतेल उद्योगावर पडलेल्या आयकर विभागाच्या धाडीचे पडसाद आता केवळ लातूरपुरते मर्यादित राहिले नसून सोलापूरसह संपूर्ण मराठवाड्यात आणि राज्यातील इतर भागांतही उमटू लागले आहेत. उद्योगाचे व्यवहार आणि खरेदी प्रक्रिया ठप्प झाल्याने सोयाबीन बाजारात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.खरेदी ठप्प; दरांमध्ये ५ ते १०% पर्यंत मोठी घसरण होत असून संबंधित उद्योग हा लातूर, सोलापूर व आसपासच्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी प्रमुख खरेदीदार मानला जात होता. धाडीनंतर उद्योगाने सावध भूमिका घेत खरेदी मंदावल्याने बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर प्रति क्विंटल ४०० ते ५०० रुपयांनी घसरल्याची माहिती व्यापारी व शेतकरी संघटनांकडून मिळत आहे.
यामुळे आधीच खर्चाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. मराठवाड्यात अस्थिरता लातूर आणि सोलापूरमधील खरेदी कमी झाल्याने त्याचा परिणाम बीड, उस्मानाबाद, परभणी, नांदेड आदी मराठवाड्यातील बाजारांवरही जाणवत आहे. मोठा खरेदीदार बाजारातून बाहेर पडल्याने व्यापाऱ्यांनी सावध पवित्रा घेतला असून दरांमध्ये चढ-उतार वाढले आहेत. या अस्थिरतेचा परिणाम जवळजवळ महाराष्ट्रातील इतर सोयाबीन पट्ट्यांवरही दिसू लागला आहे. तेल दरांवर ही परिणाम होवून कच्चा माल पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने खाद्यतेलाच्या दरातही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही ठिकाणी किरकोळ दरात वाढ झाल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे, शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही या परिस्थितीचा फटका बसत आहे. उद्योग व्यवहार बंद राहिल्याने; सोयाबीन खरेदी ठप्प झाल्याचे चित्र दिसत आहे परिणामी, सोयाबीनच्या दरात प्रति क्विंटल ४०० ते ५०० रुपयांपर्यंत चढ-उतार होत असल्याची माहिती बाजार समिती सूत्रांकडून मिळाली.
यामुळे आधीच खर्चाच्या वाढीने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.परंतू कमी झाले तरी तेल पुड्याचा भाव मात्र दिवसेंदिवस वधारत चालला आहे.तेलाच्या डब्यामागे १०० ते १५० रुपयांची नफेखोरी?होताना दिसत आहे दरम्यान, बाजारातील काही खासगी कंपन्यांनी परिस्थितीचा फायदा घेत खाद्यतेलाच्या डब्याच्या किमतीत वाढ केल्याचा आरोप ग्राहक संघटनांनी केला आहे. प्रति डब्बा १०० ते १५० रुपयांपर्यंत अतिरिक्त नफा घेतला जात असल्याची चर्चा आहे.यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत असून घरगुती बजेट कोलमडण्याची वेळ आली आहे. आता यावर शासनाच्या हस्तक्षेपाची मागणी होताना दिसत आहे. उद्योग बंद ठेवण्याची जबाबदारी कोण घेणार? शेतकऱ्यांचे नुकसान कोण भरून काढणार? ग्राहकांना दिलासा कधी मिळणार? सोयाबीन खरेदीसाठी पर्यायी यंत्रणा उभी करावी. खाद्यतेलाच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथक नियुक्त करावे. तपासाच्या पार्श्वभूमीवर उद्योगाचे व्यवहार पारदर्शक असावेत, मात्र त्याचा परिणाम थेट शेतकरी व ग्राहकांवर होऊ नये, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. शासनाने तातडीने समन्वय साधून बाजारातील स्थैर्य राखणे गरजेचे असल्याचे मत व्यापारी व्यक्त करत आहेत.

No comments