adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ड्युटीवरून वाद विकोपाला; चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यातच दोन कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी

 ड्युटीवरून वाद विकोपाला; चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यातच दोन कर्मचाऱ्यांमध्ये  हाणामारी  चोपडा प्रतिनिधी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा –...

 ड्युटीवरून वाद विकोपाला; चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यातच दोन कर्मचाऱ्यांमध्ये  हाणामारी 


चोपडा प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा – कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करणाऱ्या खाकी वर्दीतच अंतर्गत वादातून धक्कादायक प्रकार घडल्याची घटना चोपडा ग्रामीण पोलीस ठाणे येथे समोर आली आहे. ड्युटी लावण्याच्या कारणावरून दोन पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये शनिवारी रात्री जोरदार हाणामारी झाली. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी शशिकांत पारधी आणि राकेश पाटील यांच्यात ड्युटीच्या नियोजनावरून सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. काही क्षणांतच या वादाने उग्र रूप धारण केले आणि दोघांनी एकमेकांवर हल्ला चढवला. पोलीस ठाण्याच्या आवारातच झालेल्या या ‘फ्री स्टाईल’ हाणामारीमुळे उपस्थित कर्मचाऱ्यांमध्येही काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

या झटापटीत शशिकांत पारधी यांच्या डोक्याला गंभीर मार लागला असून त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर राकेश पाटील यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत होऊन अस्थिभंग झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेता त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेतली. पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले की, दोन्ही कर्मचारी गेली तीन ते चार वर्षे येथे कार्यरत असून त्यांच्यात काही जुने मतभेद होते. ड्युटी नियोजनाच्या कारणावरून वाद पुन्हा उफाळून आला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. कायद्याचे पालन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच पोलीस ठाण्यात अशा प्रकारे कायदा हातात घेतल्याने पोलीस दलाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या दोघांवर उपचार सुरू असून,प्रशासन पुढे कोणती शिस्तभंगाची कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments