adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महामार्गावर तळबीड पोलिसांची धडक कारवाई, तासवडे फाट्यावर विदेशी दारू साठ्यासह युवक तळबीड पोलिसांच्या ताब्यात!

 महामार्गावर तळबीड पोलिसांची धडक कारवाई, तासवडे फाट्यावर विदेशी दारू साठ्यासह युवक तळबीड पोलिसांच्या ताब्यात!   सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी...

 महामार्गावर तळबीड पोलिसांची धडक कारवाई, तासवडे फाट्यावर विदेशी दारू साठ्यासह युवक तळबीड पोलिसांच्या ताब्यात!  


सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 उंब्रज-कराड राष्ट्रीय महामार्गावर बेकायदा दारू वाहतुकीला आळा घालण्यासाठी तळबीड पोलिसांनी गुरुवारी दि. 19 फेब्रुवारी 2026 दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारांस तासवडे गावाच्या फाट्यावर सापळा रचून धडक कारवाई केली. महामार्गावरून संशयित हालचाली करणाऱ्या दुचाकीची तपासणी दरम्यान एका युवकांकडे मोठ्या प्रमाणात विदेशी दारूचा साठा आढळून आला. या कारवाईत एका युवकाला ताब्यात घेण्यात आले असून, दारूचा साठा व वाहन असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. वाढत्या बेकायदा दारू वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर तळबीड पोलिसांनी केलेल्या या कारवाईकडे अनेकांचे विशेष लक्ष वेधले जात आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस शिपाई प्रविण जयवंत गायकवाड (ब. नं. 1875, तळबीड पोलीस ठाणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वैभव सुखदेव कोरडे (वय 25) रा. गजानन हौसिंग सोसायटी, गोवारे ता.कराड जि. सातारा) हा युवक आपल्या ताब्यातील हिरो कंपनीची काळ्या रंगाची मेस्ट्रो मोपेड (क्र. MH 50 D 1269) वरून परवानगीशिवाय विदेशी दारू विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करताना तळबीड पोलिसांना आढळून आला.

 यावेळी पोलिसांनी एकूण सुमारे 19 हजार 400 किंमतीचा विदेशी दारूचा साठा हस्तगत केला आहे. यामध्ये विविध ब्रँडच्या 90 मि.ली., 180 मि.ली., 500 मि.ली. व 650 मि.ली. क्षमतेच्या बाटल्यांचा समावेश आहे.

जप्त साठ्यात ग्रॅन्ड मास्टर कॅनबेरी होडका, ग्रीन लेबल व्हिस्की, ओल्ड मंक रम, इम्पेरिअल ब्लू, रॉयल चॅलेंज, मास्टर डिलाईट, रॉयल ग्रीन, मॅकडोनाल्ड, मुंबई मल्ट, रॉयल स्टॅग तसेच टुबर्ग, किंगफिशर व लंडन पिल्सनर स्ट्रॉंग बिअरच्या बाटल्यांचा समावेश होता.

याशिवाय अंदाजे 30 हजार किंमतीची हिरो मेस्ट्रो मोपेड (क्र. MH 50 D 1269) देखील जप्त करण्यात आली आहे.

सदरची कारवाई ही उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तळबीड पोलीस ठाण्याचे नूतन सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, PSI प्रशांत पाटील, ASI आनंदा रजपूत, पोलीस हवालदार योगेश भोसले, आप्पा ओंबसे, पोलीस नाईक कुपदीप कोळी पोलीस शिपाई प्रवीण गायकवाड, सुशांत कुंभार, अभय मोरे, मारुती बाकले यांनी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिनकर काळे करीत आहेत.

तळबीड पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरांतील बेकायदा दारू वाहतुकीवर आळा बसण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. तळबीड पोलीस ठाण्याचा पदभारही नव्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी नुकताच स्वीकारला असल्यामुळे या त्यांच्या पहिल्याच कामगिरीमुळे तळबीड पोलिसांचे जनतेतून विशेष कौतुक होत आहे. सदरची कामगिरी ही  जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्यासह तळबीड पोलीस ठाणेकडील आदीं कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता.

No comments