वाल्मिक चौक ते अप्सरा चौक सिमेंट काँक्रिटीकरण दुभाजका सह रस्त्याच्या कामात घोळ ? प्रशासकीय मान्यता नुसार काम नाही, सार्वजनिक बांधकाम उपवि...
वाल्मिक चौक ते अप्सरा चौक सिमेंट काँक्रिटीकरण दुभाजका सह रस्त्याच्या कामात घोळ ?
प्रशासकीय मान्यता नुसार काम नाही, सार्वजनिक बांधकाम उपविभाग तथा जळगाव प्रशासनाकडे सामाजिक कार्यकर्ते तथा स्वराज्य पोलीस मित्र माहिती अधिकार व पत्रकार सरंक्षण संघटनेचे भुसावळ तालुका अध्यक्ष मिलिंद सोनवणे यांची तक्रार
भुसावळ (प्रतिनिधी) :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भुसावळ शहरातील वाल्मिक चौक ते अप्सरा चौक दरम्यान सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामात गंभीर त्रुटी व प्रशासकीय मान्यतेचा भंग असल्याचा आरोप करत सोनवणे यांची सार्वजनिक बांधकाम प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. संबंधित काम प्रशासकीय मान्यतेनुसार व तांत्रिक निकषांनुसार न होता घाईघाईने व नियमबाह्य पद्धतीने केले जात असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
सार्वजनिक बांधकाम मार्फत सदर रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर असतानाही प्रत्यक्षात रस्त्याचे कामा मध्ये अनियमितता दिसून येत असल्याचे सोनवणे यांचे म्हणणे आहे. सुरक्षितता उपाययोजना अथवा तांत्रिक देखरेख नसल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.माहिती घेणे सुरु आहे
या रस्त्याच्या कामाबाबत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग कडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई अथवा उत्तर देण्यात आलेले नाही, असा आरोप सोनवणे यांनी केला आहे. त्यामुळे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
सदर कामाची तातडीने तांत्रिक चौकशी, प्रशासकीय मान्यता तपासणी करून दोषींवर कारवाई करावी, प्रशासकीय मान्यते नुसार रस्ता पूर्ण करावा अशी मागणी केली आहे. कायदेशीर मार्गाने आज दि. 10/02/2026 रोजी भुसावळ उपविभागीय कार्यालय सार्वजनिक बांधकाम भुसावळ येथे आमरण उपोषण सुरु केले आहे या पुढे कायदेशीर मार्गाने दोषीवर कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही उपोषण कर्ते यांनी दिला आहे.उपोषण स्थळी शहर पोलीस स्टेशनं चे कर्मचारी पो. हे. संदेश निकम,पो. हे. दीपक पाटील हे कर्तव्यावर आहेत.

No comments