आदरणीय डॉ.संगीता पाण्डेय यांना नवी दिल्लीत ‘विद्या वाचस्पती’ (पीएच.डी.) पदवी प्रदान, सर्व स्तरांतून अभिनंदनचा वर्षाव ! (संभाजी पुरीगोसावी...
आदरणीय डॉ.संगीता पाण्डेय यांना नवी दिल्लीत ‘विद्या वाचस्पती’ (पीएच.डी.) पदवी प्रदान, सर्व स्तरांतून अभिनंदनचा वर्षाव !
(संभाजी पुरीगोसावी ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
नवी दिल्ली : हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी कार्य करणाऱ्या पं. दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ (मथुरा) तर्फे आयोजित भव्य सोहळ्यात महाराष्ट्रांतील बिहार येथील सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेल्या आदरणीय सौ. संगीता पाण्डेय यांना सन्मानपूर्वक 'विद्या वाचस्पती' (पीएच.डी.) ही पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली। नवी दिल्ली येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये पार पडलेल्या या राष्ट्रीय हिंदी संगोष्ठीत देशांतील ६० विद्वानांचा गौरव करण्यात आला.दिग्गज मान्यवरांच्या हस्ते गौरव हा सन्मान सोहळा झांशीच्या राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू पद्मश्री डॉ. अरविंद कुमार, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंदूभूषण मिश्रा, आणि छत्तीसगड भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रबल प्रताप सिंह जू देव झेड आर. यू .सी.सी. रेल्वे बोर्ड सदस्य डॉ. शिवाजी रामभाऊ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला आहे. अध्यापन क्षेत्रात उत्कृंष्ट कार्य आणि उल्लेखनीय योगदानाबद्दल सौ. संगीता पाण्डेय यांना पदक, प्रशस्तीपत्रक आणि शाल श्रीफळ देवुन सन्मानित करण्यात आले आहे. चार वर्षांचा अध्यापन क्षेत्रातील अनुभव आहे. संगीता पाण्डेय या मूळच्या बिहार येथील मितोहारी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अधिवक्ता तथा उद्योगपती स्व.विजयकुमार मिश्रा यांच्या कन्या आहेत.त्या उच्च विभूषित आणि अतिशय हुशार आहेत.इयत्ता 10 वी परीक्षा मध्ये पूर्ण बिहार राज्यांतून सहाव्या क्रमांकांवर उत्तीर्ण झाल्या आहेत. महाविद्यालय शिक्षण त्यांनी इंटरमिडीयट सायन्स च्या परीक्षेत गोल्ड मेडलिस्ट असून त्या जंतुशास्त्र या विषयांत प्रथम श्रेणी मध्ये झाल्या पुढील शिक्षण त्यांनी मोदी इष्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जयपूर येथे पूर्ण केले.त्या नंतर वडील वारले आणि वडिलांचे स्पप्न पूर्ण करण्यासाठी न खचता त्यांनी बायोटेक्नालॉजी या विषयात श्रेणीतच प्रथम क्रमांक पटकावला. यावरही न थांबता अतिशय हिंमतीने त्यांनी आपले शिक्षण पुढे सुरूच ठेवले इन्व्हायरनमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, नागपूर मधून आपले रिसर्च पूर्ण केले.अतिशय कमी वयात म्हणजे वयाच्या 37 व्या वर्षी त्यांनी अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमांतून गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले त्यांना लागणाऱ्या सर्व शैक्षणिक साहित्य त्यांच बरोबर कपडे, जेवण्याची राहण्यासाठीची सोय करून दिली. आजही त्या अनेक गरीबांना आणि होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देतात.त्यांच या यशामुळे पुणे आणि बिहार परिसरांतून आनंद आणि त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

No comments