चोपडा नगर परिषदेचा आगळा वेगळा अन्नपूर्णा महोत्सव व पर्यावरणपूरक पाककला स्पर्धा उत्साहात संपन्न चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-;हेमकांत गायकवा...
चोपडा नगर परिषदेचा आगळा वेगळा अन्नपूर्णा महोत्सव व पर्यावरणपूरक पाककला स्पर्धा उत्साहात संपन्न
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:-;हेमकांत गायकवाड)
चोपडा नगरपरिषदेमार्फत नगराध्यक्ष नम्रता पाटील व मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्या संकल्पनेतून माझी वसुंधरा अभियान ६.० व स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत प्रथमच आगळा वेगळा असा अन्नपूर्णा महोत्सव व पर्यावरणापूरक पाककला स्पर्धा दिनांक. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी आक्कासो शरद चंद्रिका सुरेश पाटील नाट्यगृह येथे सायंकाळी ०४.०० वाजेपासून ते रात्री १०.०० वा पर्यंत माजी आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे उद्घाटक नगराध्यक्षा नम्रता पाटील व प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष पंकज बोरोले,आरोग्य सभापती रमेश शिंदे,महिला बालकल्याण समिती सभापती देवयानी माळी हे होते.कार्यक्रमाची सुरवात ही हळदी-कुंकू कार्यक्रमाने झाली यामध्ये माजी आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे व नगराध्यक्षा नम्रता पाटील यांचे हळदी-कुंकू स्वच्छता निरिक्षक दिपाली साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच सर्व सन्माननीय नगरसेविका यांचे हळदी-कुंकू कार्यक्रम संपन्न झाला.
स्वच्छ भारत अभियान (ना.) २.० व माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत आयोजीत पर्यावरणपूरक पाककला स्पर्धा २०२६ मध्ये ६० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धकांनी सादर केलेले पदार्थ यांची चव व त्यांची पर्यावरणपूरक सजावट प्रेक्षकांचे महत्वाचे आकर्षण ठरले. स्पर्धेकरीता परिक्षक म्हणून डॉ.धनश्री महाजन व महिला व बालकल्याण अधिकारी पुनम ठाकरे,अंतर्गत लेखापरिक्षक भारती पाटील यांनी जबाबदारी पार पाडली. माजी आमदार लताताई सोनवणे, नगराध्यक्षा नम्रता पाटील, मा.मुख्याधिकारी श्री.रामनिवास झंवर व सर्व सन्माननीय नगरसेविका यांनी सर्व स्पर्धकांची पदार्थांची चव व सजावट पाहुन सर्व स्पर्धकांचे कौतुक केले. यामध्ये पर्यावरणपूरक पाककला स्पर्धेचे विजेते प्रमिला छगन बडगुजर, रंजना विजय चौधरी, रुपाली पवन पाटील, किरण आनंदा चौधरी,अनिता संतोष पारधी हे ठरले तर ५ स्पर्धक यांना उत्तेजनार्थ ठरले.
चोपडा नगरपरिषदेमार्फत आयोजीत केलेल्या अन्नपूर्णा महोत्सव २०२६ (प्रथम वर्ष) यामध्ये महिला बचत गट यांनी महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे व स्थानिक पारंपरिक खाद्यसंस्कृतीला प्रोत्साहन देणारे स्टॉल्स महिला बचत गट यांच्या मार्फत लावण्यात आले होते. यामध्ये महिलांनी पारंपारिक खाद्य संस्कृती जपूण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडविले. यामध्ये एकूण २७ महिला बचत गटांनी स्लॉल्स लावण्यात आले होते. महिला बचत गटातील महिलांनी लावण्यात आलेल्या स्टॉल्स करीता कोणतेही नोंदणी शुल्क नगरपरिषदेमार्फत आकारण्यात आलेले नव्हते. तसेच घरात गृहिणी म्हणून राबणाऱ्या महिला बचत गट यांना नगरपरिषदेमार्फत एक स्वयंरोजगाराकरीता व्यासपीठ निर्माण करण्यात आलेले होते. यामध्ये खाद्य स्टॉलवर नागरीकांची गर्दी आढळून आली. यामध्ये नागरीकांनी विविध खाद्य पदार्थ खरेदी करुन आस्वाद घेतला. (यामध्ये पंचायत समिती कडील महिला बचत गट, धरणगांव नगरपरिषदेतील महिला बचत गट यांचा देखील समावेश होता. दत्तकृपा महिला बचत गट (पाणीपुरी / उपवास पापड), एकदंत महिला बचत गट (पाव वडा), सुवासिनी महिला बचत गट (कळण्याची भाकर भरीत),बहुजन महिला बचत गट (मुंगभजी चहा),गजानन महिला बचत गट (चकली,शंकरपाळे,खमणपीठ,चकली पीठ),भैरवनाथ महिला बचत गट (बॅग व पर्स),वैभव महिला बचत गट (गोळा सरबत),प्रथमेश महिला बचत गट (इटली सांबार),भिमाशंकर महिला बचत गट (बिरयानी,खमणे),जय परशुराम महिला बचत गट (मिसळ पाव,पावभाजी), शिवबा महिला बचत गट (पाणीपुरी), सुहान महिला बचत गट (वडापाव),सुर्यदेवता महिला बचत गट (गोळा सरबत),साईनाथ महिला बचत गट (बटाटा पोंगे),नवश्या मारोती महिला बचत गट (इटली सांबार,गाजर हलवा,पाव वडा),चमेली महिला बचत गट (मुंग भजी),क्रांती महिला बचत गट (पोंगे बटाटा केळी वेफर),बेलपत्र महिला बचत गट (समोसा कचोरी गुळाचा चहा),शिवबाबा महिला बचत गट (चौवला फल्ली,मसाला पान),संत तुकाराम महिला बचत गट (पेस्टी केक),वक्रतुंड महिला बचत गट (कळण्याची भाकर आणि ठेचा), प्रसाद महिला बचत गट (पाणीपुरी)) यावेळी महिला बचत गट सदस्यांनी नगरपरिषदेने ही संकल्पना राबवून महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिली. याबद्दल सर्व महिला बचत गटांनी नगरपरिषदेचे आभार मानले.अश्या विविध प्रतिक्रिया बचत गटांमार्फत प्राप्त झाल्या.कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार सौ.लताताई सोनवणे व नगराध्यक्षा नम्रता पाटील यांनी सांगितले की,महिलांसाठी चोपडा नगरपरिषदेमार्फत प्रथमच हळदी-कुंकू कार्यक्रम, पर्यावरणपूरक स्पर्धा व अन्नपूर्णा महोत्सव घेण्यात आला यामध्ये गृहिणी,महिला बचत गट व नागरीक यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला व नगरपरिषदेमार्फत स्वयंरोजगारासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिलेले होते. त्याचा महिला बचत गट यांना चांगले फायदेशीर ठरले. त्याचप्रमाणे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी कार्यक्रम प्रसंगी प्रतिपादन केले की,महिला बचत गट यांना स्वयंरोजगारासाठी चालना मिळावी,त्यांच्या उत्पादनांना चालना मिळावी हा मुख्य उद्देश होता. नगरपरिषद या पुढे दरवर्षी असा उपक्रम राबवेल.तसेच नगरपरिषदेमार्फत हळदी-कुंकू कार्यक्रम करण्यात येऊन प्रथम येणाऱ्या २००० महिलांकरीता स्टील वाटी वाण म्हणून वाटप करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रणव पाटील यांनी केले कार्यक्रमाप्रसंगी सांस्कृतिक व क्रिडा सभापती अमोल पाटील,गटनेता रमाकांत ठाकुर,नगरसेवक प्रविण देशमुख,नगरसेवक दिपक पाटील,नगरसेविका सौ.नेहा जैन,पुजा देशमुख,वंदना बाविस्कर,वैशाली पवार सर्व सन्माननीय नगरसेवक/नगरसेविका तसेच परिविक्षाधीन मुख्याधिकारी सागर शेजुळ,उपमुख्याधिकारी संजय मिसर,कर निरिक्षक संदिप गायकवाड,शहर अभियान व्यवस्थापक,गणेश पाठक,शहर समन्वयक स्वप्निल धनगर आदी उपस्थित होते.



No comments