नाथपंथी समाजाच्या श्रद्धास्थानांवर झालेल्या निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर फैजपुर प्रांत अधिकारी यांना निवेदन सादर इदू पिजारी फैजपूर (स...
नाथपंथी समाजाच्या श्रद्धास्थानांवर झालेल्या निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर फैजपुर प्रांत अधिकारी यांना निवेदन सादर
इदू पिजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव व तालुक्यात मोजे हिंगणा येथे नाथपंथी समाजाच्या देवस्थानांमध्ये (नवनाथ मंदिर) झालेल्या मूर्तींच्या विटंबनेमुळे संपूर्ण नाथपंथी समाजाच्या भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्या आहेत. या घटनेबाबत दोषींवर तात्काळ व कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कडक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.
हे निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते लखन भाऊ इंगळे यांच्यासह नाथपंथी समाजाचे छगन नाथजोगी ,संतोष नाथजोगी,सुनील नाथजोगी ,मगन जोगी विकी, नाथजोगी ,जितेंद्र नाथ जोगी, आकाश नाथजोगी , भावेश नाथजोगी सर्व कार्यकर्ते व मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्रितपणे शांततेच्या मार्गाने न्यायाची मागणी करत प्रशासनाने या गंभीर विषयाची तातडीने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
नाथपंथीय समाज हा सदैव शांतताप्रिय असून, कायदा व सुव्यवस्थेवर विश्वास ठेवणारा आहे. मात्र समाजाच्या श्रद्धेवर आघात झाला तर त्याची योग्य दखल घेणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे या प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा देऊन समाजाला न्याय मिळावा, हीच अपेक्षा यावेळी मांडण्यात आली....

No comments