रावेरमधील बिजासणी माता मंदिराजवळ दुचाकींची टक्कर! अपघातात दोन जणांचा मृत्यू मुबारक तडवी सह संपादक रावेर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) रा...
रावेरमधील बिजासणी माता मंदिराजवळ दुचाकींची टक्कर! अपघातात दोन जणांचा मृत्यू
मुबारक तडवी सह संपादक रावेर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर:- सावदा रोडवरील बिजासणी माता मंदिराजवळ दोन दुचाकीस्वारांमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू झाला तर एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाली. दोन्ही दुचाकीस्वारांच्या मृत्यूबाबत रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विवारे खुर्द येथील रहिवासी शुभम गजानन लोखंडे (वय २० वर्ष) हे त्यांच्या दुचाकीने (क्रमांक एमएच १९ बीए ८८४५) विवारेहून रावेरला जात होते. त्याच वेळी रावेरहून विवारे गावाकडे जाणाऱ्या एका व्यक्तीने त्यांना धडक दिली.
विनय विजय भालेराव हे दुचाकी चालवत होते. शुभमच्या दुचाकीला दुचाकीची टक्कर झाली, लोखंडे जागीच ठार झाले. त्यांच्यासोबत असलेल्या त्यांची आजी सुमित्राबाई लोखंडे (६९) गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर जळगाव येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या अपघातात दुचाकी चालक विनय विजय भालेराव गंभीर जखमी झाला. जळगावला नेत असताना त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर, कोळदा येथील शुभम लोखंडे आणि विनय भालेराव (२४) यांचे रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्यामध्ये दोन्ही दुचाकी चालकांवर मृत्यू घडवल्याचा आरोप आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस करत आहेत.

No comments