भिंगार कॅम्प पोलिसांची मोठी कारवाई! गुन्हेगार टोळी हद्दपार; चौघे सराईत आरोपी जिल्ह्याबाहेर सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवा...
भिंगार कॅम्प पोलिसांची मोठी कारवाई! गुन्हेगार टोळी हद्दपार; चौघे सराईत आरोपी जिल्ह्याबाहेर
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर:-भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन यांनी गुंड/गुन्हेगार यांचा अभिलेख तपासून हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे टोळी हद्दपार प्रस्ताव सादर केला असता हद्दपार इसम नामे नजीश उर्फ नन्या साजिद सय्यद रा.बाबळे कॉलनी, मुकुंदनगर ता.जि.अहिल्यानगर),असद इरफान सय्यद वय 27 वर्ष रा.हमीद पार्क,मरीयम मस्जिद जवळ, मुकुंदनगर ता.जि.अहिल्यानगर,अफनान उर्फ अप्पु आदिल शेख वय 23 वर्ष रा.घर नं 8/4 रचना हौसिंग, बाबळे कॉलनी मुकुंदनगर ता.जि.अहिल्यानगर,वसीम उर्फ धन्या फारुख शेख वय 27 वर्ष रा.जुने दारूगल्ली तांबटकर गल्ली,तेलीखुंट ता.जि.अहिल्यानगर यांना एक वर्षाकरीता हद्दपार केले बाबतचा आदेश जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घार्गे यांनी आदेश पारित केला अ.क्र.नं 1 ते 3 हद्दपार इसमांना दिनांक 03/02/2026 रोजी तात्काळ ताब्यात घेऊन अहिल्यानगर जिल्ह्याच्या हद्दीबाहेर सोडण्यात आले आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग डॉ.दिलीप टिपरसे यांचे मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगिर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार रवींद्र पांडे,राम माळी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे अहमद इनामदार,इस्राईल पठाण,रवी टकले,प्रमोद लहारे, रेखा पुंड, किरण बर्वे यांनी केली आहे.

No comments