कोसगाव शिवारातील वाघुळदे डीपी (विद्युत वितरण ट्रान्सफॉर्मर) आठ दिवसांपासून जळाली; शेतकऱ्यांचा संताप वाढला काल्पनिक फोटो भरत कोळी यावल (सं...
कोसगाव शिवारातील वाघुळदे डीपी (विद्युत वितरण ट्रान्सफॉर्मर) आठ दिवसांपासून जळाली; शेतकऱ्यांचा संताप वाढला
![]() |
| काल्पनिक फोटो |
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : तालुक्यातील कोसगाव शिवारातील अधिकारी रस्त्यावरील वाघुळदे डीपी (विद्युत वितरण ट्रान्सफॉर्मर) क्रमांक ५ गेल्या आठ दिवसांपासून जळालेल्या अवस्थेत आहे. मात्र, वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून डीपी दुरुस्ती किंवा बदलाबाबत हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
सध्या परिसरात गहू, हरभरा तसेच केळी पिकांना पाण्याची अत्यंत गरज आहे. काही शेतकऱ्यांच्या गव्हाला शेवटचे पाणी देणे बाकी असून उशिरा पेरलेल्या हरभऱ्यालाही सिंचन आवश्यक आहे. वाढत्या उन्हामुळे केळी पिकाला ताण बसत असून पाण्याअभावी उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
वीजपुरवठा खंडित झाल्याने मोटारी बंद पडल्या असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करूनही अद्याप नवीन डीपी (विद्युत वितरण ट्रान्सफॉर्मर) बसविण्याची कार्यवाही झालेली नाही, अशी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
सावदा वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन कोसगाव शिवारातील वाघुळदे डीपी (विद्युत वितरण ट्रान्सफॉर्मर) क्रमांक ५ नव्याने बसवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
.png)
No comments