मनवेल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल : ग्रामीण भागातील जिल्हा ...
मनवेल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथिमिक शाळा टिकविण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना शिक्षणासाठी जिल्हा परिषद शाळेत नाव दाखल करून मराठी सकृती टिकवली पाहिजे असे प्रतिपादन साकळी येथील लोकनियुक्त सरपंच दिपक पाटील यांनी मनवेल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उदघाटन प्रसंगी बोलताना सांगितले.
मनवेल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंकज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
यावेळी यावल कृर्षि उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुर्यभान पाटील, देविदास कोळी, पत्रकार गोकुळ कोळी, विशाल पाटील, दगडी पोलिस पाटील विठ्ठल कोळी, प्रियंका पाटील, केंद्रप्रमुख किशोर चौधरी, सीमा कोळी, भगवान इंधाटे, दगडी शाळेचे मुख्यधापक ईश्वर तागड, मुख्यधापक संगीता पाटील उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्लिस मेडीयमचे वेध लागले आहेत मात्र इंग्लिस मेडीयमचे शिक्षण मराठी माध्यमातून मोफत जिल्हा परिषदेच्या शाळेत मिळत असून मराठी सकृती टिकविण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना गावाच्या शाळेत लक्ष देऊन शाळेची प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी व आपल्या पाल्यांचे भवितव्यासाठी मराठी शाळेची निवड करावी असे आवाहन साकळी येथील सरपंच दिपक पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थानी विविध प्रकारचे देश भक्ती व साकृतिक गाणे सादर केले. उमेश कोळी आकाश कोळी राहुल कोळी रविंद्र कोळी कीरण कोळी यानी सहकार्य केले. उपशिक्षक दिपक चव्हाण यांनी प्रास्तविक केले तर प्रविण पाटील यांनी आभार मानले

No comments