राज्य महिला आयोग नेहमीच प्रयत्नशील, महिलांनी आपल्या तक्रारी पुढे येवुन मांडाव्यात:- सौ. रूपाली चाकणकर! सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी प्रति...
राज्य महिला आयोग नेहमीच प्रयत्नशील, महिलांनी आपल्या तक्रारी पुढे येवुन मांडाव्यात:- सौ. रूपाली चाकणकर!
सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र राज्य महिला आयोग (स्थापना 25 जानेवारी 1993) महिलांवरील अन्याय,अत्याचार रोखण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.955209 या हेल्पलाइनद्वारे समुपदेशन, कायदेशीर मदत महिला सुरक्षा कामाच्या ठिकाणी छळ वागणूक रोखणे, आणि आर्थिंक सक्षमीकरणासाठी राज्य महिला आयोग कार्यरत असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली तक्रारीचे जलद निवारण करण्यात येते. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडूंन महिला आयोग आपल्या दारी, या उपक्रमांतून प्रत्येक जिल्ह्यातील तक्रारीचे जनसुनावणी सुरू असून स्वता: आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपाली चाकणकर उपस्थित असतात. जिल्ह्यातील महिला भगिनींनी पुढे येवुन न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात असे आव्हान रूपाली चाकणकरांनी केले आहे. महिला भगिनीनींच्या तक्रारीचे जिल्ह्याच्या ठिकाणीच निराकरण व्हावे यासाठी महिला आयोग आपल्या दारी, हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहे. राज्यांच्या कानाकोपऱ्यातील महिलांना मुंबई कार्यालयात येवुन आपली तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आर्थिंक दृष्ट्या तसेच इतर कारणांमुळे शक्य होत नाही. त्यामुळे आयोग जिल्हा स्तरावर सर्व यंत्रणेसोबत उपस्थित राहणार आहे. यामध्ये जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक कामगार आयुक्त, आरोग्य, परिवहन शिक्षण आदीं विभागांचे अधिकारी यांच्यासह विधी सल्लागार समुपदेशक,जिल्हा समन्वयक आदीं यावेळी उपस्थित राहणार असल्याने तक्रारींवर त्याच ठिकाणी कारवाई करण्यात येईल, या उपक्रमांतून कैफियत मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याचे काम आयोग करत आहे असेही आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.

No comments