स्ट्रेचिंगच्या बहाण्याने विश्वासघात! तरुणीवर अत्याचार,गर्भवती ठरताच जबरदस्ती गर्भपात रनर्स अकॅडमी चालकावर गंभीर गुन्हा सचिन मोकळं अहिल्यान...
स्ट्रेचिंगच्या बहाण्याने विश्वासघात! तरुणीवर अत्याचार,गर्भवती ठरताच जबरदस्ती गर्भपात रनर्स अकॅडमी चालकावर गंभीर गुन्हा
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर:-स्ट्रेचिंग करण्याच्या बहाण्याने एका महाविद्यालयीन विद्यार्थिनी सोबत जवळीक साधत,तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केल्या प्रकरणी येथील रनर्स अकॅडमीचा चालक जावेद शेख (सध्या रा.जकाते नगर,श्रीगोंदे) याच्या विरुद्ध श्रीगोंदे पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.पीडित विद्यार्थिनी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे.ती नोव्हेंबर २०२४ पासून रनर्स अकॅडमीमध्ये सरावासाठी जात होती.एके दिवशी पीडितेने आपला पाय लचकल्याचे प्रशिक्षक जावेद शेख यास सांगितले.त्यावेळी त्याने तिला दुसऱ्या दिवशी पहाटे मैदानावर बोलविले.त्यावेळी स्ट्रेचिंग करण्याच्या बहाण्याने तो पीडितेला स्पर्श करू लागला.तिने विरोध करूनही त्याने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केले. सदरबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली.जानेवारी २०२५ मध्ये पीडितेचे पोट दुखू लागल्याने ती शहरातील ग्रामीण रुग्णालयात गेली.तिथे तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.तिने ही बाब जावेद शेख याला सांगितली.त्यावेळी आरोपीने त्याच्या एका साथीदारासह पीडितेच्या खोलीजवळ जाऊन तिला गोळ्या दिल्या.त्या गोळ्या खाल्ल्याने तिचा गर्भपात झाला.या संपूर्ण प्रकरणात पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीवरून श्रीगोंदे पोलीस ठाण्यात आरोपी जावेद शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. ही घटना प्रशिक्षक आणि विद्यार्थिनी यांच्यातील विश्वासाचा गंभीर गैरवापर असल्याने समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

No comments