बाल गोपाळांची मंगल सहल अमळनेर येथे उत्साहात संपन्न चोपडा (प्रतिनिधी) : (संपादक -:- हेमकांत गायकवाड) “शुभास्ते पंथानः सन्तु..!” या मंगल शुभ...
चोपडा (प्रतिनिधी) :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
“शुभास्ते पंथानः सन्तु..!” या मंगल शुभेच्छांसह पंकज बालसंस्कार केंद्र, चोपडा येथील बालगोपाळांची शैक्षणिक व अध्यात्मिक सहल अमळनेर येथील प्रसिद्ध श्री मंगळग्रह मंदिर येथे अत्यंत आनंदी व उत्साही वातावरणात पार पडली.
सहलीसाठी रवाना होण्यापूर्वी वाहनाचे पूजन मुख्याध्यापक एम. व्ही. पाटील , विभाग प्रमुख सौ. मीना माळी , पालक प्रतिनिधी व शिक्षिका यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना सहलीदरम्यान शिस्त, सुरक्षितता आणि परस्पर सहकार्याचे महत्त्व पटवून दिले. तसेच विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधून त्यांच्या मनातील उत्साहाला प्रोत्साहन दिले.
मंदिर परिसरात पोहोचल्यावर मुलांनी निसर्गाच्या सानिध्यात आणि अध्यात्मिक वातावरणात आनंद लुटला. मंगळग्रह संस्थानच्या वतीने विद्यार्थ्यांना संपूर्ण परिसराची माहिती देण्यात आली तसेच प्रसादाचे वितरण करण्यात आले. संस्थानच्या व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांची योग्य ती काळजी घेण्यात आली.
मंदिर परिसरातील सुंदर बागेत विद्यार्थ्यांनी मनसोक्त खेळत आनंद द्विगुणित केला. शाळेकडून विद्यार्थ्यांसाठी भोजन व आईस्क्रीमची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. आईस्क्रीमचा आस्वाद घेताना मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य हा सहलीचा खरा आनंद ठरला.
विशेष म्हणजे या सहलीत शिशु गटापासून मोठ्या गटापर्यंत, म्हणजेच तीन ते सहा वर्षे वयोगटातील सर्व विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते. या सहलीमुळे विद्यार्थ्यांना अध्यात्म, निसर्ग व सहजीवनाचे संस्कार प्रत्यक्ष अनुभवातून मिळाले.




No comments