नरवेल येथे १५ व्या वित्त आयोगातून वॉटर चिलर व एक्वा मशीनचे लोकार्पण किरण धायले मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मुक्ताईनगर – तालुक्य...
किरण धायले मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर – तालुक्यातील नरवेल येथे ग्रामपंचायतीच्या वतीने १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून नागरिकांसाठी स्वच्छ व थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वॉटर चिलर मशीन व एक्वा मशीन बसविण्यात आली. लक्ष्मीनारायण मंदिर चौक येथे या यंत्रणेचे लोकार्पण उत्साहात पार पडले.
गावकऱ्यांच्या आरोग्याचा विचार करून आणि उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. उद्घाटन प्रसंगी सरपंच मोहन सुधाकर महाजन यांनी ग्रामपंचायतीतर्फे करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांची माहिती देत, ग्रामस्थांच्या सहकार्यामुळेच अशी कामे शक्य होत असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाला तंटामुक्ती अध्यक्ष शांताराम भाऊ कापसे, प्रभाकर सोनू तायडे, दिगंबर भागवत महाजन, ज्ञानेश्वर भिकू महाजन, संतोष सुभा धनगर, निवृत्ती शांताराम कोळी, संतोष माणिक महाजन, श्रीराम कापसे, हिरामण महाजन, जितेंद्र महाजन, जगदीश कापसे, विजय देविदास कोळी, विजय प्रभाकर कोळी, सुखदेव महाजन यांच्यासह गावातील असंख्य नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे ग्रामस्थांना वर्षभर स्वच्छ व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून, ग्रामपंचायतीच्या या लोकाभिमुख निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.

No comments