adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांना जड अंतःकरणाने अखेरचा निरोप, शासकीय मानवंदना, पोलिसांसह उपस्थितांचे डोळे पाणावले

 वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांना जड अंतःकरणाने अखेरचा निरोप, शासकीय मानवंदना, पोलिसांसह उपस्थितांचे डोळे पाणावले   संभाजी पुरीगो...

 वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांना जड अंतःकरणाने अखेरचा निरोप, शासकीय मानवंदना, पोलिसांसह उपस्थितांचे डोळे पाणावले 


 संभाजी पुरीगोसावी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

पुणे शहर पोलीस दलातील लोणीकंद पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय सर्जेंराव शामराव कुंभार (वय 50) यांचे शनिवारी मध्यरात्री हृदयविकारांच्या तीव्र धक्क्याने निधन झाले अत्यंत शांत,स्वयी आणि हसतमुख अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुंभार साहेब यांच्या जाण्यामुळे पोलीस दलासह सर्वसामान्यांही शोक सागरात बुडले, कुंभार यांच्या पश्चांत आई पत्नी मुलगा मुलगी भाऊ भावजय असा परिवार आहे. मुलगा सिद्धेश आणि मुलगी सिद्धी सध्या शिक्षण घेत आहे. सिद्धी ही बी.ए.एम.एसचे शिक्षण घेत असून वडिलांच्या जाण्यामुळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंभार साहेब हे आपली चोख ड्युटी करून शनिवारी 10 वाजता वडगांवशेरी येथील घरी परतले होते. मध्यरात्री 2च्या सुमारांस त्यांना अचानक हृदयविकारांचा तीव्र धक्का बसला त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र दुर्दैवांने उपचारांपूर्वीच त्यांची प्राणज्योत मावळली. कोल्हापूरमधील हातकणंगले तालुक्यांतील चावरे या मुळगावी त्यांच्यावर पोलीस प्रशासनाकडूंन शासकीय मानवंदना मानवंदना देवुन जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला आहे. 12 ऑक्टोंबर 2024 रोजी त्यांनी लोणीकंद पोलीस ठाणेचा पदभार स्वीकारला होता. नुकताच 25 ते 27 जानेवारी दरम्यान त्यांच्याकडे वाघोली पोलीस ठाणेचा अतिरिक्त कार्यभार होता. याच काळात दोन खुनाच्या घटना घडल्या होत्या पण दबावाखाली न येता कुंभार यांनी तातडीने आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्याच उत्कृंष्ट कामगिरीबद्दल 2025 मध्ये त्यांना सुरक्षित पुणे, पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले होते. अंत्यसंस्कार दरम्यान अनेकांनी जड अंतःकरणाने कुंभार यांच्या पार्थिंवाचे दर्शन घेत शोक व्यक्त केला. राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि पोलीस प्रशासन तसेच पुणे शहर चे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनीही पार्थिंवाचे दर्शन घेत आम्ही कर्तव्यदक्ष अधिकारी गमावला अशा शब्दांत शोक व्यक्त केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंभार यांना अखेरचा निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले

No comments