चोपडा नगर परिषदेतर्फे आगळ्या वेगळ्या अन्नपूर्णा महोत्सव व पर्यावरणपूरक पाककला स्पर्धेचे प्रथमच आयोजन चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत ग...
चोपडा नगर परिषदेतर्फे आगळ्या वेगळ्या अन्नपूर्णा महोत्सव व पर्यावरणपूरक पाककला स्पर्धेचे प्रथमच आयोजन
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा नगर परिषदेमार्फत नगराध्यक्ष नम्रता पाटील व मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्या संकल्पनेतून माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत प्रथमच अन्नपूर्णा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये महिला बचत गटांचे विविध खाद्य स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे व स्थानिक पारंपरिक खाद्यसंस्कृतीला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
याचबरोबर महिलांसाठी “पर्यावरणपूरक पाककला स्पर्धा 2026” चेही आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये पर्यावरणपूरक साहित्याचा वापर, आरोग्यदायी व पारंपरिक पाककृतींना विशेष महत्त्व देण्यात येणार आहे. हा उपक्रम पूर्णपणे प्लास्टिकमुक्त व कचरा कमी करणे या संकल्पनेवर आधारित आहे. महिलांसाठी हळदी कुंकू चा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेला आहे
हा संपूर्ण कार्यक्रम दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी आ क्कासो शरद चंद्रिका सुरेश पाटील नाट्यगृह येथे सायंकाळी 4.00 वाजेपासून ते रात्री 10.00 वा पर्यंत मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत महिलांच्या कौशल्यांना व सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळणार आहे. तरी या अन्नपूर्णा महोत्सवात खाद्य स्टॉल यांना नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा व पाककला स्पर्धेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन चोपडा नगर परिषदेमार्फत मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी केले आहे.

No comments