विकासकामांच्या जोरावर फर्दापूर गणात आ. अब्दुल सत्तार यांचेच पारडे जड! बौद्ध समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध; पत्रकार प्रविण तायडे यांचे मत ...
विकासकामांच्या जोरावर फर्दापूर गणात आ. अब्दुल सत्तार यांचेच पारडे जड!
बौद्ध समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध; पत्रकार प्रविण तायडे यांचे मत
फर्दापूर (विशेष प्रतिनिधी):
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फर्दापूर:- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असून मतदानाला अवघे ४ दिवस शिल्लक असताना फर्दापूर गणात राजकीय वातावरण तापले आहे. यातच आता "बौद्ध समाजाने आमदार अब्दुल सत्तार यांच्या पक्षाच्या उमेदवारांना मतदान का करू नये?" असा उपरोधिक सवाल उपस्थित करत, ज्येष्ठ पत्रकार प्रविण तायडे यांनी आ. सत्तार यांनी केलेल्या विकासकामांचा पाढा वाचत त्यांचेच पारडे जड असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात प्रविण तायडे यांनी भाजपच्या उमेदवारांवर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की, आ. सत्तार यांच्या उमेदवारांनी प्रचाराची सुरुवात करताना सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांचा सन्मान राखला. मात्र, भाजपा उमेदवारांनी फर्दापूर येथे प्रचारादरम्यान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास साधे पुष्पहार अर्पण करण्याचेही सौजन्य दाखवले नाही. केवळ मतांसाठीच यांना बौद्ध समाजाची आठवण येते का? असा तिखट सवाल तायडे यांनी उपस्थित केला आहे. तसेच, धम्माचल येथील कार्यक्रमांकडे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व अल्पसंख्याक नेते ईद्रीस मुलतानी यांनी पाठ फिरवल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
आ. सत्तार यांनी फर्दापूर आणि बौद्ध समाजासाठी दिलेले योगदान:
आ. अब्दुल सत्तार यांनी जातीपातीचे राजकारण न करता केवळ विकासाला प्राधान्य दिल्याचे तायडे यांनी नमूद केले. त्यांच्या माध्यमातून झालेली प्रमुख कामे खालीलप्रमाणे:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार: जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या पायथ्याशी असलेल्या फर्दापूर प्रवेशद्वाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले.
स्मशानभूमी विकास: फर्दापूर येथील बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीला संरक्षण भिंत व सुशोभीकरणाचे काम पूर्ण.
धम्माचल विकास: फर्दापूर येथील धम्माचल येथे बौद्ध उपासक व भंतेजींसाठी २ कोटी रुपयांचे सुसज्ज यात्री निवास उभारले जात आहे.
भीम पार्क प्रकल्प: फर्दापूर टी-पॉईंट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर आधारित भव्य 'भीम पार्क' व स्मारक उभारण्यात येत असून, यासाठी ११० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
सभा मंडप: महामार्गालगत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात लवकरच भव्य सभा मंडपाचे काम सुरू होणार आहे.
मतदारांना आवाहन:- डॉ. बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून या विकासकामांची जाण ठेवून आणि ऋण फेडण्यासाठी आ. अब्दुल सत्तार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन प्रविण तायडे यांनी केले आहे. फर्दापूर गणातील जिल्हा परिषद उमेदवार प्रभावती दारासिंग चव्हाण आणि पंचायत समिती उमेदवार शेख मुक्तार शेख मुन्शी यांना प्रचंड बहुमताने विजयी करून आपले कर्तव्य बजावावे, अशी विनंती त्यांनी बौद्ध समाजाला केली आहे.

No comments