मुलांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या जीवनाला आकार देण्यात आई वडिलांचे कष्ट- व्याख्याते जितेंद्र आसोले ! प्रकाश विद्यालयात रंगपंचमी व्याख्यानमाल...
मुलांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या जीवनाला आकार देण्यात आई वडिलांचे कष्ट- व्याख्याते जितेंद्र आसोले !
प्रकाश विद्यालयात रंगपंचमी व्याख्यानमालेचे आयोजन
मुबारक तडवी सह संपादक रावेर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा बुद्रुक तालुका रावेर येथील चक्रधर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित प्रकाश विद्यालय ज्युनिअर कॉलेज च्या सभागृहात रंगपंचमी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर येथील व्माख्याते जितेंद्र आसोले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले मुलांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या जीवनाला आकार देण्यासाठी आईवडिलांना कष्ट करावे लागतात, आपले आयुष्यच समर्पित करावे लागते; म्हणून आई वडिलांची मान खाली जाईल असे कधीही वागू नका, त्यांच्या जीवनात दुःखाचे आणि पश्चातापाचे अश्रू येणार नाहीत याची काळजी घ्या असे आवाहन युवा व्याख्याते जितेंद्र असोले (नागपूर) यांनी केले. येथील रंगपंचमी व्याख्यानमालेच्या वतीने आयोजित तिसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते.रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा बुद्रुक येथील प्रकाश विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात हे व्याख्यान संपन्न झाले. अध्यक्षस्थानी चक्रधर शिक्षण प्रसारक मंडळाचे व्हाईस चेअरमन विजय पाटील होते.
श्री आसोले म्हणाले की, चेहऱ्यापेक्षा चारित्र्य सुंदर ठेवा, १४ ते २१ वय हे जीवनाला आकार देणारे असून याच काळात अधिकाधिक अभ्यास करा, स्वतःवर विश्वास ठेवा, या डिजिटल युगातही पुस्तकांना कोणताही पर्याय नाही म्हणून पुस्तकांशी मैत्री करा, महापुरुषांच्या जीवनाविषयी फक्त ऐकून चालणार नाही तर त्यांचे विचार, आचार कृतीत आणा तरच तुमचा आणि कुटुंबाचा भविष्यकाळ उज्वल राहील असे प्रतिपादन त्यांनी केले. वयाची २१ वर्षे पूर्ण होईपर्यंत सोशल मीडियाचा वापर करूच नये, ऑस्ट्रेलियासारख्या प्रगत देशात विद्यार्थ्यांच्या सोशल मीडियावर बंदी घातल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती आणि चक्रधर स्वामींच्या प्रतिमेचे पूजन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक व्याख्यानमालेचे विश्वस्त दिलीप वैद्य यांनी केले. कार्यक्रमास व्याख्यानमालेचे अध्यक्ष प्रा पंकज पाटील, सचिव प्रा विनोद पाटील, ज्येष्ठ संचालक डॉ एस डी चौधरी, शाळेचे पर्यवेक्षक राजेश बडगुजर, शिक्षिका कल्पना पाटील, शिक्षक बी टी सपकाळे, प्रा श्रीकांत सपकाळे उपस्थित होते. सूत्रसंचालन युवराज पवार यांनी केले. व्याख्यानास मोठ्या संख्येने शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.


No comments