उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार प्रितीसंगमावर दिवंगत स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांना विनम्र आदरांजली! संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा)...
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार प्रितीसंगमावर दिवंगत स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांना विनम्र आदरांजली!
संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
राज्यांचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या पुण्यतिथीनिमिंत्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी कराड येथील प्रीतीसंगमावर समाधी स्थळावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार वाहिनी साहेब प्रसार माध्यमांशी बोलताना पुढे म्हणाल्या... विरोधक आणि सत्ताधारी राज्यांत एकोपा निर्माण करून समाजकारण आणि राजकारण कसे करायचे यांची आदर्श मुहूर्तमेढ व शिकवण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिली आहे. महाराष्ट्रांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी त्या काळात घेतलेले निर्णय आजही महत्त्वपूर्ण ठरतात त्यांचे विचार त्यांचे साहित्य हे आजही आपणा सर्वांसाठी मार्गदर्शक आहेत. सामाजिक,दृष्टिकोन,सुसंस्कृतपणा संवेदनशीलता व साधेपणा या अंगभूत गुणांमुळे साहेबांच्या प्रतिमेला लाभलेली झळाही आजही कायम आहे. आपल्या कर्तुत्वांने महाराष्ट्राला दिशादर्शक ठरलेल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या उत्तंग व्यक्तीला आज त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन करताना. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार वहिनीसाहेब सौ. रूपाली ताई चाकणकर मकरंद पाटील सुनील तटकरे बाळासाहेब पाटील यांच्यासह अनेक नेत्यांची यावेळी उपस्थिती होती.

No comments