adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बारामती हादरली, बारामतीच्या सोनगावात विवाहित महिलेची आत्महत्या, आत्महत्या की हत्या, बारामती तालुका पोलिसांकडून तपासाला वेग!

 बारामती हादरली, बारामतीच्या सोनगावात विवाहित महिलेची आत्महत्या, आत्महत्या की हत्या, बारामती तालुका पोलिसांकडून तपासाला वेग!  संभाजी पुरीगोस...

 बारामती हादरली, बारामतीच्या सोनगावात विवाहित महिलेची आत्महत्या, आत्महत्या की हत्या, बारामती तालुका पोलिसांकडून तपासाला वेग!


 संभाजी पुरीगोसावी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी. 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

बारामती तालुक्यांतून सोनगांव गावातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. यामध्ये सोनगांव गावातील वस्तीवर घरात एकट्या राहणाऱ्या एका 38 वर्षींय विवाहित महिलेचा मृतदेह सुमारे मृतदेह 6 ते 7 दिवसानंतर आढळून आला आहे. अशा घटनेमुळे बारामती चांगलीच हादरली आहे. सुजाता स्वप्निल निंबाळकर (वय 38) असे या मृत महिलेचे नाव आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून सुजाता निंबाळकर या आपल्या सासरच्या घरी एकट्याच राहत होत्या तर त्यांचे पती कामानिमिंत्त पुणे येथे स्थायिक होते. तर सासू-सासरे बारामती येथे राहत होते. गेल्या 67- दिवसांपासून नातेवाईकांचा फोन उचलला नव्हता संपर्क होत नसल्याने काळजीपोटी त्यांचे भाऊ आणि माहेरचे इतर नातेवाईक सोनगांव घरी पोहोचले त्यावेळी घरात प्रवेश केला असता सुजाता यांचा मृतदेह खाटेवर आढळून आला आहे. मात्र कारण अस्पष्टच पण नैसर्गिक मृत्यू असल्याची शक्यता: सध्या वर्तवली जात आहे. मात्र सुजाता निंबाळकर यांचा मृतदेह हा ब्लँकेट मध्ये झाकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. मात्र आत्महत्या की, अत्याचार करून हत्या, असाही प्रश्न उपस्थित होत आहे मात्र या घटनेची माहिती बारामती तालुका पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवुन पंचनामा केला. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे निश्चित कारण समजू शकेल मात्र प्राथमिक पाहणीत हा नैसर्गिक मृत्यू असावा असा कयास लावला जात आहे. त्यामुळे आता बारामती तालुका पोलिसांकडून या घटनेच्या तपासाला गती मिळाली आहे.

No comments