adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वृद्धाच्या उपचारासाठी आणलेले ३ लाख रुपये लंपास…कोतवाली पोलिसांची वेगाने कारवाई असा लावला सापळा..आरोपी 'लाला' पुणे येथून जेरबंद

 वृद्धाच्या उपचारासाठी आणलेले ३ लाख रुपये लंपास…कोतवाली पोलिसांची वेगाने कारवाई असा लावला सापळा..आरोपी 'लाला' पुणे येथून जेरबंद   सच...

 वृद्धाच्या उपचारासाठी आणलेले ३ लाख रुपये लंपास…कोतवाली पोलिसांची वेगाने कारवाई असा लावला सापळा..आरोपी 'लाला' पुणे येथून जेरबंद  


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर:-वृद्ध व्यक्तीच्या उपचारासाठी आणलेले तब्बल ३,००,०००/- रुपये (रुपये तीन लाख) चोरून पसार झालेल्या आरोपीस कोतवाली पोलीस स्टेशन यांच्या पथकाने अवघ्या काही तासांत शोध घेऊन गजाआड केले आहे.दि.२२/०२/२०२६ रोजी कोतवाली पोलीस स्टेशनचे गुन्हे/तपास पथकाचे अंमलदार हे पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग व फरार आरोपींचा शोध घेत असताना,पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार भादवि कलम ३०४ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी लाला किसन सुद्रिक (रा.कर्जत जि.अहिल्यानगर) हा पुणे बस स्थानक या ठिकाणी फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.त्यानुसार पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी तपास पथकाचे अंमलदार यांना बोलावून आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले.पथकाने तत्काळ बस स्थानक परिसरात जाऊन सापळा रचला व आरोपीस ताब्यात घेतले.सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांनी वृद्ध व्यक्तीच्या उपचारासाठी आणलेले रुपये ३,००,०००/- हे आरोपीने चोरून नेल्याचे निष्पन्न झाले.तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात पोलिसांना यश आले.आरोपी कडून गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल जप्त करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे, उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप टिपरसे,कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संतोष बनकर,राहुल शिंदे,महिला पोलीस अंमलदार दरंदले,विनोद बोरगे,साबीर शेख,दौंड,विशाल दळवी,अविनाश वाकचौरे,शिरीष तरटे,अभय कदम,सुरज कदम, सत्यम शिंदे,दत्तात्रय कोतकर, अतुल काजळे,अमोल गाडे,महेश पवार,रमेश शिंदे,राम हंडाळ, किरण बडे,अतुल लाटे,दक्षिण मोबाईल सेलचे अंमलदार राहुल गुंडू,महिला पोलीस अंमलदार पंडित,रोहकले,जाधव यांनी केली आहे.

No comments