adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

संत गाडगेबाबा जयंती ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात उत्साहात साजरी

 संत गाडगेबाबा जयंती ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात उत्साहात साजरी  किरण धायले मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शिक्षण, स्वच्छता आणि सा...

 संत गाडगेबाबा जयंती ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात उत्साहात साजरी 


किरण धायले मुक्ताईनगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

शिक्षण, स्वच्छता आणि सामाजिक न्यायासाठी आयुष्यभर कार्य करणारे, कीर्तनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा व अनिष्ट रूढी-परंपरांविरुद्ध जनजागृती करणारे राष्ट्रसंत संत गाडगेबाबा यांची जयंती ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात भक्तीभावाने साजरी करण्यात आली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संत गाडगेबाबांनी स्वच्छता, शिक्षण आणि समाजसेवेचा दिलेला संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रमास पगारे साहेब, सुरेश शांताराम महाजन, मधुकर वानखेडे, अनिल न्हावकर, प्रभाकर महाजन, नेमाडे, नितीन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी संत गाडगेबाबांच्या कार्याचे स्मरण करून समाजप्रबोधनाचा संकल्प केला. कार्यक्रमाचे आयोजन ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने करण्यात आले.

No comments