शासकीय कार्यालयांत खासगी व्यक्तींचा सर्रास वावर; वरिष्ठांच्या आशीर्वादाने मनमानी कारभार? शासकीय कार्यालयात खासगी व्यक्तीना ठेवण्यासाठी मना...
शासकीय कार्यालयांत खासगी व्यक्तींचा सर्रास वावर; वरिष्ठांच्या आशीर्वादाने मनमानी कारभार?
शासकीय कार्यालयात खासगी व्यक्तीना ठेवण्यासाठी मनाई असताना अनेक कार्यालयात खासगी व्यक्तींचा सर्रास वावर, महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कार्यालयामार्फत जनतेच्या हितासाठी लागणारी महत्वाचे कागदपत्रे केवळ शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या व्यक्तीस हाताळण्याचे अधिकार असताना मात्र दुय्यम निबंधक कार्यालय, तलाठी कार्यालय, आर टी ओ कार्यालय, पुरवठा विभाग, तहसील कार्यालय अशा प्रकारच्या विविध शासकीय कार्यालयात खासगी व्यक्तींचा सर्रास वावर कुणाच्या आशीर्वादाने आहे वरील कार्यालयात केव्हाही फेरफटका मारताना खासगी व्यक्तीं आपल्या स्वतःचे बापाची मालमत्ता असल्याचा भास आणून राजरोसपणे कार्यरत आहेत तरी देखील संबंधित खात्याचे वरिष्ठ अधिकारी वर्ग मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत तर नाही ना एवढ्या मोठ्या प्रमाणावर मनमानी कारभार सुरू असताना संबंधित खात्याचे वरिष्ठ अधिकारी वर्ग यांना हां प्रकार स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी कसा दिसत नाही हे विशेष म्हणावं लागेल यावरून स्पष्ट होते की संबंधित खात्याचे वरिष्ठ अधिकारी वर्ग यांचे आपल्या कार्यालयांवर किती नियंत्रण आहे तरी शासनाने याची तात्काळ उच्चस्तरीय सखोलपणे चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे शहरातील दुय्यम निबंधक कार्यालय तलाठी कार्यालय पुरवठा विभाग तहसील कार्यालय अशा ठिकाणी कार्यरत असलेल्या खासगी व्यक्तींचा भांडाफोड करण्यासाठी सुरुवात केली जात आहे ज्या शासकीय कार्यालयात खासगी व्यक्तींचा सर्रास वावर होत असेल तर त्या खात्याच्या वरिष्ठ अधिकारी वर्ग यांच्यावरच शिस्त भंगासारखी कार्यवाही करण्यात यावी यासाठी शासनाने शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या व्यक्तीस ओळख पत्र वापरणे बंधनकारक केलेले असताना देखील या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात नाही हा विषय देखील महत्वाचा भाग आहे यासाठी साप्ताहिक खरे सव्वाशेर वर्तमानपत्र संपादक लियाकत पठाण शासन दरबारी लेखी स्वरूपात नम्र निवेदन सादर करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जाणार आहे

No comments