adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त पोस्टर सादरीकरण व राज्यस्तरीय ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात संपन्न

 राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त पोस्टर सादरीकरण व राज्यस्तरीय ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात संपन्न  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकां...

 राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त पोस्टर सादरीकरण व राज्यस्तरीय ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात संपन्न 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा — महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, श्रीमती शरच्चंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंजिनिअरिंग & पॉलिटेक्निक), चोपडा येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त पोस्टर सादरीकरण स्पर्धा व राज्यस्तरीय ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन उत्साहात करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य प्रा. व्ही. एन. बोरसे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटनाने झाली. उद्घाटनप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांनी विज्ञानाकडे जिज्ञासू व संशोधक दृष्टीकोन ठेवावा, तसेच नवकल्पनांना प्रोत्साहन देऊन समाजहितासाठी कार्य करावे, असे मार्गदर्शन केले.पोस्टर सादरीकरण स्पर्धेत एकूण ५४ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण, ऊर्जा, नवकल्पना आदी विविध विषयांवर माहितीपूर्ण व आकर्षक पोस्टर्स सादर करून आपली सर्जनशीलता व वैज्ञानिक दृष्टिकोन प्रभावीपणे मांडला.


त्यानंतर विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक ज्ञानाची चाचणी घेण्यासाठी राज्यस्तरीय ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली. सामान्य विज्ञान, तंत्रज्ञान व चालू घडामोडी या विषयांवर आधारित ही स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने यशस्वीरित्या पार पडली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एन. आर. शिंदे यांनी  केले. यावेळी प्रा. एम. एस. पाटील व प्रा. पी. के. चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले व विज्ञान दिनाचे महत्त्व अधोरेखित केले.या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष मा. भैय्यासाहेब अॅड. संदीप सुरेश पाटील व सचिव मा. ताईसाहेब डॉ. स्मिता संदीप पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments