ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालय व समता फाउंडेशन कांताई नेत्रालय जळगाव यांचे मार्फत निशुल्क नेत्र तपासणी व मोतीबिंदू शास्त्रक्रिया शिबिर संपन्न ...
ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालय व समता फाउंडेशन कांताई नेत्रालय जळगाव यांचे मार्फत निशुल्क नेत्र तपासणी व मोतीबिंदू शास्त्रक्रिया शिबिर संपन्न
किरण धायले मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अंतुर्ली तालुका मुक्ताईनगर येथे समता फाउंडेशन कांताई नेत्रालय जळगाव व ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालय अंतुर्ली यांचे संयुक्त विद्यमाने निशुल्क नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन आज दिनांक 1/2/ 2026 रविवारी आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन सौ वंदनाताई संतोषराव देशमुख यांनी श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमेचे पूजन करून व त्यांचे स्मृतीस वंदन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष श्री एस ए भोई सर होते .प्रमुख अतिथी पोलीस पाटील किशोर मेढे,भाऊराव महाजन ,अनिल वाडीले , प्राचार्य बी .डी.बारी सर,शेख भैय्या शेख करीम, किरण धायले, एस एस भोई सर, सुमनबाई जिरी, मंदाबाई सोनवणे, छायाबाई पाटील, चिमाबाई भोई,मधुकर कंकरे, बंडू शिरतुरे,व मान्यवर, वाचक उपस्थित होते.
मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी 16 रुग्णांची निवड करण्यात आली. रुग्णांची तपासणी कांताई नेत्रालयाचे डॉक्टर जॅकी शेख, प्रवीण संतोष राठोड समता फाउंडेशन यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिल न्हावकर, शांताराम महाजन, किरण धायले यांनी प्रयत्न केले.

No comments