adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शिशिराचे उधळणी माघ,वसंताचं आगमण

  शिशिराचे उधळणी माघ,वसंताचं आगमण   मराठी कवितेच्या दालणात निसर्गाच्या सानिध्यातील दरी डोंगराळ भागातील निसर्ग सौंदर्य नटलेल्या वनस्पती सृष्ट...

 शिशिराचे उधळणी माघ,वसंताचं आगमण 



 मराठी कवितेच्या दालणात निसर्गाच्या सानिध्यातील दरी डोंगराळ भागातील निसर्ग सौंदर्य नटलेल्या वनस्पती सृष्टीत बदलाला वेगवेगळ्या कवींच्या कवितेतून मुख्य ऋतू बरोबरच सहा उप ऋतुतून नवचैतन्य शब्दबद्ध केले आहे.

 कवयित्री अलका कुलकर्णी आला वसंत कवितेतून म्हणतात...

         _रानाफुलांच्या झेल्यात_ 

          _गंध दाटला मनात_ 

                        _सृष्टी नटली अमाप_ 

                        _आला अंगणी वसंत_ 

         _पानगळला शिशिर,_ 

          _पौष,माघ शहारला,_ 

                       _पळसाला झाला भार_ 

                        _रक्तवर्णी कुसुमांचा_ 

         _चिंचा गाभुळल्या रानी_ 

          _मोहरली आमराई,_ 

  हिवाळ्याच्या हंगामातील थंडीची चाहूल सरतेवेळी शिशिर ऋतूत झाडांची हिरवी पाने पिवळी पडून गळतात आणि झाड खराट्यावानी मोकळी दिसतात आणि दोड्यातून फुले कोवळी फुलं उमलतात आणि झाडाखाली पखरणच दाटते ही फुले जणू निसर्गाच्या सानिध्यात रंग उधळत आहेत असे वाटते त्यातून मानवी मन शांत व प्रसंन्न होऊन जाते.एकमेकांबद्दल प्रेम,आपुलकीची, भाव सौंदर्य भावना मनात बिंबवले जाते आदिवासी डोंगराळ भागातील निसर्गाच्या सानिध्यातील दरी खोरीतील माळरानावर झापावरील गरीब परिस्थितीतील मानवी जीवन शहरातील रासायनिक कुलर एस्सीच्या हवेपेक्षा नैसर्गिक रान सौंदर्याच्या फुलांची हवा स्वर्गापेक्षा महान वाटते.निवांत माळरानावर कडे कपारीत फुलांचा सुगंध दरवळत फांद्या जमिनीवर लवून आलेल्या सौंदर्य फुलांच्या पाकळ्यांंनी नटलेल्या फांद्या यावर पाखरांची मेजवानीच भरत असते पक्षांचे थवेच्या थवे हे सौंदर्य नटलेले वृक्ष जणू आपल्या भेटीला बोलवतात शहरातून ग्रामीण भागातील रस्त्यांने येणारे पर्यटक हे छायाचित्र घेऊन आनंद घेतात. अशातच फाल्गुन महिन्यात वसंत ऋतूचे आगमन होते. वसंतात पळस केसरी रंगाच्या फुलांनी बहरून गेलेला असतो.  

यंदा होळी सनाच्या आधी फेब्रुवारी पासूनच माघ महिन्याची सुरुवात झाली आहे.पंगारा हा पाणझडी वृक्ष लाल फुलांनी बहरून गेलेला आहे.याच महिन्यात आंबा मोहोरून येतो आणि रानात चिंच फळ लाल रंगानी गाभुळन (आदिवासी भागातील शब्द पुसाटून) पीकतात.नदी किणारी जामणीची, जांभुळ झाडं पांढऱ्या फुलांनी  बहरून जातात.अशाचवेळी रानातील मोहाची झाडे पिवळी पाने खकरून पाकळ्यांनी भरून गेलेली असतात दुसरीकडे करवंदाची झुडप पांढरे फुलांनी बहरून जातात,काटेरी सावलीचा झाड लाल फुलांनी बहरून जाते, अशावेळी रानातील निसर्गाच्या सानिध्यातील दरी डोंगराळ भागात दऱ्याखोऱ्यात कडेकपारीत घनदाट अरण्यात वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आणि वेलीचा घमका फुलोरा फुलून गर्भाळ अवस्थेत आढळून येते तोरणीची वेलवर्गीय वनस्पती पांढऱ्या फळांचा गोड मगच भरायला भर येतो कवी निंबा निकम वडा विषयी म्हणतात..

      _आला वसंत वसंत_ 

        _गोड गुंजते कोकीळ_ 

         _शुक काढीते गळा_ 

       _वड बसलाय काठी_ 

       _पाय सोडून मोकळा_ 

 पिंपळ झाडे फळांनी पीकून भरून गेलेली असतात कवी काळूदास कनोजे पिंपळपान कवितेत म्हणतात..

          _बारमाही तो हिरवा_ 

           _पाखरांचा तो सहारा_  

            _खोपा बांधून फांदीला_ 

             _घेती रातीला निवारा_

              

                _फुलं हिरवी जांभळी_ 

                _जसा गडूचा आकार_ 

                _येती फळ पिकणीला_ 

                 _झेप घेती पाखरं_ 

             

पिंपळ  झाडावर बगळ्यांची रहाळी असते फाल्गुन महिन्यात प्रणयाचा काळ असतो त्यामुळे झाडाखाली साळुंखी पक्षांची खालेल्या फळांची विष्ठा सांडलेली असते. हिवाळ्यात शिशिर ऋतूमध्ये थंड हवेची झुळूक कमी होऊन वसंत ऋतूत मातीची धूप गरमीई भरते नदी पात्रात पाण्याचा निचरा कमी होऊन होऊन पाणी दहाडात साचून राहते. त्यात पाण  झडलेल्या बाभळीचे प्रतिबंध उमटून दिसते.रानातील  पक्षी अवकाशात झेप घेऊन भ्रमंती करताना दिसतात कोकळ पक्षाचा आवाज रानात घुमायला सुरुवात होते.कावळ्यांची, चिमण्यांची,कोकतर,चष्मेवाला, कोतवाल, भारद्वाज,खार,मोहट(रानमांजर) या पशु,पक्षांची रानात फुललेल्या झाडा झुडपात वेलीवर वर्दळच भरते ..

            श्री. सुभाष नारायण कामडी 

                        ( संशोधक)

No comments