adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

हृदयद्रावक घटना..मुलाकडून आईचा निर्घृण खून..मृतदेहा शेजारीच बसला गोट्या खेळत..

 हृदयद्रावक घटना..मुलाकडून आईचा निर्घृण खून..मृतदेहा शेजारीच  बसला गोट्या खेळत..  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्या...

 हृदयद्रावक घटना..मुलाकडून आईचा निर्घृण खून..मृतदेहा शेजारीच  बसला गोट्या खेळत.. 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर:-  मधील गुलमोहर रस्त्यावरील नवलेनगर परिसरात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.एका मनोविकृत तरुणाने स्वतःच्या जन्मदात्री आईचा भिंतीवर डोके आपटून व चाकूने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.मृत महिलेचे नाव बेबी गवारे असे असून, पोलिसांनी तिचा मनोविकृत मुलगा सुहास गवारे यास ताब्यात घेतले आहे.प्राथमिक तपासात ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याचे समोर आले आहे.आज दुपारी दोनच्या सुमारास कौटुंबिक वादातून सुहास गवारे या तरुणाने आपल्या जन्मदात्री आई बेबी गवारे यांना मारहाण केली.त्यानंतर भिंतीवर डोके आपटून तसेच घरातील चाकूने वार करून त्यांचा निर्घृण खून केला.खून केल्यानंतर आरोपी आईच्या मृतदेहा शेजारी गोट्या खेळत बसला होता.शेजाऱ्यांना प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना कळविले.तोफखाना पोलिस घटनास्थळी दाखल झाले असता आरोपीने घराचे दरवाजे आतून बंद केले होते.मृतदेहा शेजारी गोट्या खेळत बसलेला आरोपी पोलिसांना पाहून विचित्र हावभाव करत असल्याचे दिसून आले.पोलिसांनी प्रयत्न पूर्वक दरवाजा उघडून संशयितास ताब्यात घेतले.घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी गर्दी जमली होती. या हृदयद्रावक प्रकारामुळे संपूर्ण नवलेनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सुहास गवारे याला ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरू आहे.

No comments