adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर पालिकेच्या सभेत नगरसेवकांची मोठ्या प्रमाणावर अनुपस्थिती; राजकीय वर्तुळात आरोप–प्रत्यारोपांना उधाण

  फैजपूर पालिकेच्या सभेत नगरसेवकांची मोठ्या प्रमाणावर अनुपस्थिती; राजकीय वर्तुळात आरोप–प्रत्यारोपांना उधाण इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -:- ह...

 फैजपूर पालिकेच्या सभेत नगरसेवकांची मोठ्या प्रमाणावर अनुपस्थिती; राजकीय वर्तुळात आरोप–प्रत्यारोपांना उधाण


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी पालिकेच्या सभागृहात पार पडली. या सभेला नगराध्यक्ष सौ. दामिनी सराफ, मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांच्यासह सहा नगरसेवक व दोन स्वीकृत नगरसेवक उपस्थित होते. मात्र एकूण १३ नगरसेवक गैरहजर राहिल्याने शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे.

विशेष म्हणजे उपनगराध्यक्ष निकिता कोळी तसेच भाजपचे गटनेतेही या सभेस अनुपस्थित राहिल्याचे दिसून आले. लोकप्रतिनिधींच्या इतक्या मोठ्या संख्येने अनुपस्थितीमुळे सभेतील चर्चांबाबत व संभाव्य निर्णयांबाबत नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या अनुपस्थितीमागे राजकीय कारणे आहेत का, असा सवाल उपस्थित होत असून राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना जोर आला आहे.

दरम्यान, अनेक नगरसेवकांच्या अनुपस्थितीमागील नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. त्यामुळे शहरातील नागरिकांसह राजकीय क्षेत्रातही या घटनेबाबत उत्सुकता वाढली असून आगामी बैठकीत यासंदर्भात अधिक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. फैजपूरच्या स्थानिक राजकारणात या घटनेची जोरदार चर्चा रंगू लागली असून पुढील सभांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याच पार्श्वभूमीवर नगरसेविका सुमय्या बी. शेख कुर्बान (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट) यांनी तीव्र प्रतिक्रिया देत भाजपवर आरोप केले. भाजपच्या नगरसेवकांमध्येच ताळमेळ नसताना विकासाच्या गप्पा मारू नयेत, असा टोला त्यांनी लगावला. भाजपमधील अंतर्गत मतभेदांमुळेच नगरसेवक सभेला गैरहजर राहिल्याचा आरोप त्यांनी केला.

तसेच नगरसेविका सुमय्या बी. शेख कुर्बान यांनी फैजपूर नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करून, दिवंगत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा अनंतराव पवार यांचे छायाचित्र सभागृहात लावण्यात यावे, अशी मागणीही केली आहे.

एकूणच नगरपालिकेच्या सभेतील अनुपस्थितीच्या मुद्द्यावरून फैजपूरच्या राजकारणात आरोप–प्रत्यारोप सुरू झाले असून याचे पडसाद आगामी काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

No comments