adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान

 उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान  विकास पाटील धरणगाव  (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  अमळनेर ...

 उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान 


विकास पाटील धरणगाव 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 अमळनेर सावखेडा : महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद तर्फे तात्यासाहेब ज्योतिबा फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2025- 26 यावर्षी मुळ सावखेडा .ता. अमळनेर येथील रहीवाशी व  श्री. नागेश्वर माध्यमिक विद्यालय दूधखेडा ता. शहादा जि. नंदुरबार येथील विद्यालयात  उपशिक्षक पदावर कार्यरत असलेले धनराज त्र्यंबक अहिरे यांना देण्यात आला. विशेष बाब म्हणजे राज्यातून फक्त सहा शिक्षकांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. उत्तमजी कांबळे साहेब जळगाव जिल्हा पालकमंत्री श्री गुलाबराव पाटील, नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोरजी दराडे साहेब, श्री. डि.के अहिरे (संस्थापक अध्यक्ष स. शि. प.) शिक्षणाधिकारी, समता शिक्षक परिषदेचे राज्य प्रदेशाध्यक्ष प्रा. भरतजी शिरसाट साहेब तसेच शासकीय अधिकारी, साहित्यिक, यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय अल्पबचत भवन जळगाव येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. 

उपक्रमशील, विद्यार्थी प्रिय, शिक्षक श्री. धनराज अहिरे यांच्या विषयी प्रस्ताविक करताना या कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद प्रदेशाध्यक्ष प्रा. भरत शिरसाट सर यांनी श्री. धनराज अहिरे यांची आदिवासी जिल्ह्यात विशेष उपक्रम आणि कार्याविषयी प्रास्ताविकेत सांगितले, सूत्रसंचालन म. रा.स.शि.प. जिल्हाध्यक्ष श्री. भैय्यासाहेब सोनवणे यांनी केले. तसेच संघटनेचे पदाधिकारी श्री. प्रकाश तामस्वरे सरांसह इतरांनी सहकार्य केले. आकर्षक सन्मानचिन्ह, शाल समतांगण विशेषांक, पुस्तके, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्कार मिळाल्याबद्द श्री. धनराज अहिरे यांचे संस्थेचे चेअरमन श्री. चंद्रकांत जाधव, तसेच शाळेचे मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, नातेवाईक मित्रपरिवार आणि शैक्षणिक व सामाजिक स्तरातून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

No comments