सौ. बबिता नंदलाल धनगर यांना ‘स्वामी विवेकानंद नॅशनल प्राइड अवॉर्ड २०२६’ प्रदान धुळे (प्रतिनिधी) — (संपादक -:- हेमकांत गायकवाड) श्रीराम फाऊ...
सौ. बबिता नंदलाल धनगर यांना ‘स्वामी विवेकानंद नॅशनल प्राइड अवॉर्ड २०२६’ प्रदान
धुळे (प्रतिनिधी) —
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
श्रीराम फाऊंडेशन, धुळे (शासन नोंदणीकृत) यांच्या वतीने देण्यात येणारा ‘स्वामी विवेकानंद नॅशनल प्राइड अवॉर्ड २०२६’ प्रदान करण्याचा भव्य सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात सौ. बबिता नंदलाल धनगर यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक व राष्ट्रहिताच्या कार्याबद्दल या प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार वितरण कार्यक्रम दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी सेमिनार हॉल, क्रांतिवीर नवलभाऊ कला महाविद्यालय, नवलनगर, ता. व जि. धुळे येथे पार पडला. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सौ. बबिता नंदलाल धनगर यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व शाल देऊन गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत पुढील सामाजिक व राष्ट्रउभारणीच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल श्रीराम फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचे उपस्थितांनी कौतुक केले. या पुरस्कारामुळे समाजात सकारात्मक कार्य करणाऱ्यांना प्रेरणा मिळेल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

No comments