आ. अमोल जावळे यांची उपोषणा स्थळी भेट भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल - रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोलभाऊ ज...
आ. अमोल जावळे यांची उपोषणा स्थळी भेट
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल - रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोलभाऊ जावळे यानी मुंबई येथे आदिवासी कोळी जमातीच्या आदोलन स्थळी भेट दिली २३ फेबुवारी २०२६ पासून आद्य क्रांतिकारकराघोजी भांगरे यांच्या विचारांचा वारसा जपत, महादेव कोळी (डोंगर कोळी), ढोर कोळी (टोकरे कोळी) व कोळी मल्हारया आदिवासी अनुसूचित जमातींवर गेल्या अनेक दशकांपासून होत असलेल्या व श्री. प्रशासकीय अन्यायाविरोधात आता थैट रस्त्यावर उतरून निर्णायक लढा छेडण्यात येत आहे. या प्रलंबित अन्यायकारक प्रश्नांबाबत दत्ताभाऊ सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ पासून मुंबईतील आझाद मैदान येथे मुंबई विधान भवनावर भव्य मोर्चा काढुन आमरण उपोषण सुरु आहे. या उपोषणास्थळी आमदार अमोल जावळे , आदिवासी कोळी जमातीचे अध्यक्ष हरलाल कोळी रावेर यांनी उपोषणास्थळी भेट दिली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर्यत आपला प्रशन संदर्भात चर्चा करून लवकरच योग्य निर्णय घेण्यात येईल अशी माहिती दिली.

No comments