adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सोनईत वाढत्या गुन्ह्यांचा फटका सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी निलंबित दोन वेळा गोळीबाराच्या घटनांनंतर पोलीस अधीक्षकांची कडक कारवाई

 सोनईत वाढत्या गुन्ह्यांचा फटका सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी निलंबित दोन वेळा गोळीबाराच्या घटनांनंतर पोलीस अधीक्षकांची कडक कारवाई   सचिन म...

 सोनईत वाढत्या गुन्ह्यांचा फटका सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी निलंबित दोन वेळा गोळीबाराच्या घटनांनंतर पोलीस अधीक्षकांची कडक कारवाई  


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर:- जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात येणाऱ्या सोनई पोलीस ठाणे हद्दीत वाढत्या गंभीर गुन्ह्यांमुळे अखेर प्रशासनाने कडक पाऊल उचलले आहे.सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी यांचे निलंबन करण्यात आले असून, ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केली आहे.पोलीस अधीक्षकांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, सोनई पोलीस ठाणे हद्दीत मागील सहा महिन्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे वाढले होते. विशेषतःदोन वेळा घडलेल्या गोळीबाराच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांना गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी वेळोवेळी स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या.मात्र,त्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याचे निदर्शनास आले.

कारवाईची कारणे:- मागील सहा महिन्यांत गंभीर गुन्ह्यांची वाढ, दोन वेळा गोळीबाराच्या घटना, प्रतिबंधात्मक कारवाईत हलगर्जीपणा, वरिष्ठांच्या सूचनांकडे दुर्लक्ष

कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयश पत्रकात नमूद केल्याप्रमाणे,सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी यांनी सोनई पोलीस ठाण्यात कार्यरत असताना गंभीर गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी आवश्यक प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे केल्या नाहीत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने परिस्थिती चिंताजनक बनली होती.जिल्हा पोलीस दलाची प्रतिमा राखण्यासाठी तसेच गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ही निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी देखील सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान,या कारवाईनंतर सोनई परिसरात गुन्हेगारीविरोधात अधिक कडक पावले उचलली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पोलीस प्रशासनाने नागरिकांना कायदा हातात न घेता संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे. या निलंबनामुळे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली असून, गुन्हेगारीविरोधात शून्य सहनशीलतेचा संदेश प्रशासनाने दिला आहे.

No comments