खडसे महाविद्यालयात जिमखाना डे उत्साहात साजरा सतिश गायकवाड मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मुक्ताईनगर:- नुकताच मुक्ताईनगर तालुका ए...
खडसे महाविद्यालयात जिमखाना डे उत्साहात साजरा
सतिश गायकवाड मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर:- नुकताच मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमतीची जी. जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर येथे जिमखाना डे निमित्त आयोजित करण्यात आलेल्या बक्षीस वितरण समारंभात विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला संस्थेचे सचिव मा. डॉ. सी.एस.चौधरी अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे सदस्य मा.चंद्रशेखर बढे आणि मा. पुरुषोत्तम महाजन तसेच माजी विद्यार्थी श्री .किशोर पाटील यांच्या समवेत महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ. हेमंत महाजन ,उपप्राचार्य डॉ. संजीव साळवे, उपप्राचार्य डॉ. वंदना चौधरी ,स्नेहसंमेलन प्रमुख डॉ.सविता जावळे उपस्थित होते.
या जिमखाना डे अंतर्गत वर्षभरात आंतरमहाविद्यालयीन, आंतर विभागीय व विद्यापीठ स्तरावरील स्पर्धांमध्ये उत्कृष्ट यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी उत्कृष्ट खेळाडू म्हणून शुभम हरिश्चंद्र मुलांडे या खेळाडूची निवड झाल्याने त्याचाही सत्कार व सन्मान करण्यात आला.
मा. डॉ. सी. एस .चौधरी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातही प्राविण्य मिळवावे, असे आवाहन केले. “खेळामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच संघभावना, शिस्त आणि नेतृत्वगुण विकसित होतात,” असे ते म्हणाले. जिमखाना विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रतिभा ढाके यांनी वार्षिक क्रीडा अहवाल सादर करून वर्षभरातील यशस्वी कामगिरीचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजयकुमार डांगे यांनी केले. तर आभार प्रदर्शन क्रीडा समिती सदस्य प्रा. अभिषेक पाटील यांनी केले केले. या समारंभास मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक व शिक्षक उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमामुळे महाविद्यालयात क्रीडाविषयी अधिक प्रेरणा निर्माण झाली आहे.

No comments