adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान च्या वतीने महाशिवरात्री उत्साहात संपन्न

जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान च्या वतीने महाशिवरात्री उत्साहात संपन्न   शिरपूर प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शिरपूर:- शहरातील करवंद ...

जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान च्या वतीने महाशिवरात्री उत्साहात संपन्न  


शिरपूर प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

शिरपूर:- शहरातील करवंद नाका येथे महाशिवरात्री चे औचित्य साधून जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान च्या वतीने सकाळी 11 वाजता शिंगावे गावातील मा.सरपंच राजेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते महादेवाची पूजा करून नारळ फोडून कार्यक्रमाची सुरूवात करून फराळ वितरण करण्यात आले. सायंकाळी 7 वाजला शिवभकांसाठी उपासाचे जेवण वितरीत करत राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. मनोहरजी खोंडे महाराज यांची मधुर वाणी तसेच संत तुकाराम महाराज भजनी मंडळ तोरखेडा,यांच्या अप्रतिम सहकार्याच्या माध्यमातून भक्तिमय कीर्तन सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमात आलेल्या सर्वच भाविक भक्तांनी,माता भगिनींनी उपासाचे जेवणाचा आनंद घेत कीर्तन सोहळ्याचा लाभ घेतला.


राष्ट्रीय कीर्तनकार मनोहरजी खोंडे महाराजांच्या कीर्तनात आलेले सर्वच भाविक मंत्रमुग्ध झाले असून कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, बाल विकास प्रकल्प अधिकारी सौ. वैशाली निकम,महाराष्ट्र नाभिक महामंडळ च्या जिल्हा अध्यक्षा सौ.हेमलता येशी शिंगावे येथील मा सरपंच राजेंद्र पाटील,लोकी चे मा.सरपंच भीमसिंग राजपूत,हॉटेल बाळा चे मालक राजेंद्र कोळी,भामपुर चे मा.पोलीस पाटील संभाजी पाटील,भारत मंडप डेकोरेटर्स चे मालक जीवन चौधरी,विश्वास बडगुजर,संजय चव्हाण,बाळासाहेब पाटील ,रंजना सूर्यवंशी,आर एन पवार सर,गोपाल सेंदाणे सर,बापू सोनवणे सर,अमोल साउंड सर्व्हिस बाळदे,पखवाज वादक जितेंद्र शिंपी, मंगल फुलपगारे,दिनेश पाटील आदी मंडळींचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आयोजन जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष विकास सेन उपाध्यक्ष श्रीरामचंद्र येशी यांनी केले होते तर सूत्रसंचालन यशवंत निकवाडे सर यांनी केले होते. 


No comments