adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; वेतन त्रुटी व जुनी पेन्शनसह विविध मागण्यांसाठी आंदोलन

 शासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; वेतन त्रुटी व जुनी पेन्शनसह विविध मागण्यांसाठी आंदोलन  चोपडा प्रतिनिधी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) दि. २...

 शासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; वेतन त्रुटी व जुनी पेन्शनसह विविध मागण्यांसाठी आंदोलन 


चोपडा प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

दि. २३/०२/२०२६ पासून पारोळा येथील शासकीय कर्मचारी व कर्मचारी संघटनांच्या वतीने बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले असून, संबंधित मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे. 


संपकरी कर्मचाऱ्यांनी मांडलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत – चौथ्या वेतन आयोगापासून राहिलेल्या वेतन त्रुटी तात्काळ दूर कराव्यात. शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. पदोन्नतीसाठी असलेले स्तर (पदोन्नती स्तर) कमी करावेत. कनिष्ठ सहाय्यक व वरिष्ठ सहाय्यक या पदांचे नामकरण बदलून “प्रशासन अधिकारी” असे करण्यात यावे. या मागण्यांसंदर्भात संघटनेच्या वतीने प्रशासनाला अधिकृत निवेदन देण्यात आले असून, मागण्यांवर सकारात्मक निर्णय होईपर्यंत संप सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात धर्मेंद्र सूर्यवंशी, नितीन बिरारी, अनिता पाटील, संदीप पाटील, गिरीश पाटील, विजय झांबरे, निराशा पाटील, शुभांगी अहिरे, रमाकांत खैरनार, योगेश मुसांडे, ज्योती कोळी, गुणवंत देवराज, मुकेश पाटील, ज्योत्स्ना सनेर, नीलिमा बिऱ्हाडे, धनराज पाटील, मिलिंद खंडागळे, ईश्वर सोनवणे, विशाल देवराज, दिनेश बोरसे, तडवी मॅडम, रहेमान तडवी, संजय बोरसे, प्रदीप पाटील, रोहित पाटील आदी कर्मचारी सहभागी झाले आहेत. संपामुळे शासकीय कामकाजावर काही प्रमाणात परिणाम होत असून, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी कर्मचारी संघटनेने केली आहे.

No comments