adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

डीआयजींच्या छाप्याने मटका ‘सिस्टम’ उघडी पडली; स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह

  डीआयजींच्या छाप्याने मटका ‘सिस्टम’ उघडी पडली; स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह  लातूर | जि.प्र. (उत्तम माने) (संपादक :- हेमक...

 डीआयजींच्या छाप्याने मटका ‘सिस्टम’ उघडी पडली; स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह 


लातूर | जि.प्र. (उत्तम माने)

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

लातूर शहरात सुरू असलेला मटका हा केवळ अवैध धंदा नव्हता, तर तो एका ठराविक ‘व्यवस्थेअंतर्गत’ चालत होता का? असा खळबळजनक प्रश्न डीआयजी पथकाच्या छाप्यानंतर उपस्थित झाला आहे. गोविंद पाटील व विजय लांडगे यांच्या मटका अड्ड्यावर धाड टाकत १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी या कारवाईमुळे खरी चौकशी आता स्थानिक पोलीस यंत्रणेच्या भूमिकेभोवती फिरू लागली आहे. शहरातील गल्लीबोळात मटका, ठरलेले एजंट, ठरावीक वेळा आणि मोबाईल नंबर हे वास्तव लातूरमधील सामान्य नागरिकांनाही माहीत होते. मात्र, स्थानिक पोलीस “माहिती नव्हती” असा दावा करत होते. हा अज्ञानाचा देखावा होता की हप्त्यामुळे गप्प बसलेली यंत्रणा? असा थेट सवाल आता उपस्थित केला जात आहे.

डीआयजी पथक शहरात दाखल होताच मटका अड्डे सापडतात, आरोपी सापडतात आणि रोख रक्कम जप्त होते—मग हे सगळं महिनोन्‌महिने स्थानिक पोलिसांच्या नजरेत का आलं नाही? की वरून आदेश आला, तेव्हा खालच्यांची यंत्रणा अचानक सक्रिय झाली? शहरात आता कुजबुज नाही, तर उघड चर्चा सुरू आहे, “मटका बंद झालेला नाही, फक्त हप्त्यांची साखळी तात्पुरती तुटली आहे.” जर कुठलंच संरक्षण नव्हतं, तर मटका बुकी इतक्या बिनधास्तपणे कसे वावरत होते? आणि जर संरक्षण होतं, तर ते कोण देत होतं आणि किती किमतीत? हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. या छाप्यामुळे लातूर पोलिसांवरील जनतेचा विश्वास हादरला असून, नागरिक थेट विचारत आहेत “डीआयजी पथक रोज येणार आहे का?” कारण वरिष्ठ अधिकारी आले की तरच कारवाई होते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हा छापा केवळ जुगारावरची कारवाई नसून, हप्तेखोरीच्या संशयावर टाकलेली जोरदार धाड असल्याची चर्चा आहे. मटका अड्डा सापडला… मात्र हप्त्यांचं मूळ अजूनही अंधारातच असल्याने आता पुढील कारवाईकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे.

No comments