पालिकेची सुत्रे करणदादा ससाणेंच्या हाती ! मंदावलेल्या विकासकामांना मिळाली गती !! आपला स्वच्छ, सुंदर श्रीरामपूर शहर राज्यात विकासकामांत मोठ...
पालिकेची सुत्रे करणदादा ससाणेंच्या हाती ! मंदावलेल्या विकासकामांना मिळाली गती !!
आपला स्वच्छ, सुंदर श्रीरामपूर शहर राज्यात विकासकामांत मोठा चंगा !
करण ससाणे नगराध्यक्षपदी विराजमान होताच वाहू लागली विकासाची गंगा !!
शौकतभाई शेख / श्रीरामपूर :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
“सेवा आमचा धर्म, विकास आमचे कर्म” या ब्रीदवाक्याखाली निवडणूक लढवणारे करण ससाणे यांना श्रीरामपूरच्या सुज्ञ मतदारांनी नगराध्यक्षपदी मोठ्या मताधिक्याने विजयी केले. श्रीरामपूर नगरपालिकेच्या ३२ नगरसेवकांपैकी तब्बल २० नगरसेवक काँग्रेस व आघाडी मित्रपक्षांचे निवडून आल्याने एकहाती सत्ता स्थापन करण्यास भक्कम आधार मिळाला,याकामी कॉंग्रेस आणी आघाडी मित्रपक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते,पदाधिकारी यांचे विशेष परिश्रम मोठ्या मोलाचे ठरले आहे.
प्रशासक राज संपला, विकासाला मिळाली नवी दिशा
गत साडेचार वर्षांपासून श्रीरामपूर नगरपालिकेत प्रशासक राज असल्याने शहरातील अनेक विकासकामे रखडली होती. नागरिकांना दैनंदिन जीवनात विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. शहरातील रस्ते अत्यंत खराब व खड्डेमय अपघातांचे वाढते प्रमाण घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न,स्वच्छ पाणीपुरवठ्यात अडचणी,अनेक ठिकाणी बंद स्ट्रीट लाईट या सर्व प्रश्नांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र करणदादा ससाणे नगराध्यक्षपदी विराजमान होताच विकासकामांना वेग मिळू लागला आहे.
रस्ते दुरुस्ती आणि पायाभूत सुविधांना प्राधान्य
श्रीरामपूर नगरपालिकेची सूत्रे हाती घेताच करणदादांनी सर्वप्रथम रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेतले. खड्डेमय रस्त्यांची तातडीने दुरुस्ती, डांबरीकरण आणि मुख्य मार्गांचे मजबुतीकरण सुरू करण्यात आले. तसेच घनकचरा व्यवस्थापनाकडे कटाक्षाने लक्ष, नियमित कचरा संकलन मोहिम, पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी जलवाहिन्यांची दुरुस्ती, शहरातील काही ठिकाणच्या बंद स्ट्रीट लाईट तात्काळ कार्यान्वित या निर्णयांमुळे शहरात सकारात्मक बदल दिसू लागले आहेत.
स्व.जयंतराव ससाणे यांच्या कार्यशैलीची पुनरावृत्ती
करणदादा ससाणे यांचे वडील, तालुक्याचे माजी आमदार व माजी नगराध्यक्ष जयंतराव ससाणे यांच्या कार्यकाळात श्रीरामपूरमध्ये विकासकामांचा सुवर्णकाळ अनुभवला गेला होता. त्याच कर्तबगार आणि दूरदर्शी नेतृत्वाची झलक आज करणदादा ससाणे यांच्या कार्यातून पुन्हा पाहायला मिळत असल्याची चर्चा शहरातील जनसामान्यांतून होत आहे.नागरिकांचे म्हणणे आहे की “करणदादा निर्णयक्षम आहेत, कामात गती आहे आणि प्रशासनावर त्यांची मजबूत पकड आहे.
नागरिकांचा वाढता विश्वास
नगराध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर करणदादांनी शहरातील विविध भागांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. नागरिकांच्या तक्रारी ऐकून तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. शहर विकासाच्या दृष्टीने पुढील योजना आखण्यात येत आहेत- शहर सुशोभीकरण,स्वच्छता अभियानाला चालना
स्मार्ट पायाभूत सुविधा
सार्वजनिक आरोग्य सुविधा सुधारणा तथा विकासाचा वेग कायम राहणार असल्याने श्रीरामपूर शहराला पुन्हा विकासाच्या मार्गावर आणण्याचा निर्धार करण ससाणे यांनी व्यक्त केला आहे. “शहराचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. आज श्रीरामपूर शहरामध्ये पुन्हा एकदा विकासाची गंगा वाहताना दिसत आहे. प्रशासकीय स्थैर्य, ठोस निर्णयक्षमता आणि लोकसहभाग यांच्या बळावर शहर नव्या उंचीवर झेपावेल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत. आमदार हेमंत (तात्या) ओगले,माजी नगराध्यक्षा राजश्रीताई ससाणे समवेत कॉंग्रेस व आघाडी मित्र पक्षातील नवे - जुने जाणकार आणी संवगडी तथा कॉंग्रेस पक्षातील ज्येष्ठ मार्गदर्शक नगरसेवकांचे मार्गदर्शन मोठ्या मोलाचे ठरत असल्याचेही दिसून येत आहे.

No comments