अडावद येथे सार्वजनिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप अडावद ता चोपडा येथील सार्वजनिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्ग...
अडावद येथे सार्वजनिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप 
अडावद ता चोपडा येथील सार्वजनिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना मुख्याध्यापक अशोक कदम जेष्ठ शिक्षक एम जी पाटील सचीन पाटील . नलीनी पाटील सपना कोळी व उपस्थित विद्यार्थी
अडावद प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अडावद ता चोपडा येथील सार्वजनिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आज पार पडला या कार्यक्रमांच्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक ए जे कदम होते.व्यासपीठावर जेष्ठ शिक्षक एम जी पाटील उपशिक्षिका शुभांगी देशमुख सौं नलिनी पाटील, सपना कोळी होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक ए जे कदम व उपस्थित शिक्षक यांच्या हस्ते सरस्वती मातेचे प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगतात आपल्याला शाळेत आलेले विविध अनुभव व शिक्षकाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली
जेष्ठ शिक्षक एम जी पाटील यांनी शाळेकडून मिळालेले संस्कार व शिस्त हे प्रत्यक्ष जीवनात वापर करा.मोठे स्वप्न बघा. आपली क्षमता ओळखून योग्य विद्याशाखेची निवड करा. समाजाची सेवा करा व आई वडिलांची खाली मान जाईल असे कोणतेही वाईट कृत्य करू नका असे मनोगतातून सांगितले. आर आर देशमुख नलीनी पाटील सपना कोळी यांनी विद्यार्थ्याना पेपर कसा लिहावा तसेच अभ्यास कसा करावा असे सविस्तर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापक अशोक कदम यांनी परीक्षेचे नवीन बदललेले नियम व परीक्षेला कसे सामोरे जावे. यशस्वी जीवनासाठी मंत्र आणि तंत्र सांगून पुढील वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमांचे सुत्र संचालन व आभार सचीन पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आर टी मोरे, श्रीमती सारिका चरडे, श्रीमती ज्योती पाटील, नितिन महाजन, हर्षद कंखरे,पंकज भोसले, प्रशांत पवार, जीवन सिसोदे या शिक्षकांसह राजेश बाविस्कर शुभम महाजन, राज पाटील, वासुदेव देसले, शांताराम गवळे, संजय देशमुख, साहेबराव सोनवणे, जनार्दन कोळी, ऋषिकेश साळुंखे शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
No comments