adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

निर्जन ठिकाणी नेऊन खून..शहर हादरलं…पण एमआयडीसी पोलिसांनी २४ तासांत आवळल्या मुसक्या!..

 निर्जन ठिकाणी नेऊन खून..शहर हादरलं…पण एमआयडीसी पोलिसांनी २४ तासांत आवळल्या मुसक्या!..  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अ...

 निर्जन ठिकाणी नेऊन खून..शहर हादरलं…पण एमआयडीसी पोलिसांनी २४ तासांत आवळल्या मुसक्या!.. 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर:- एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या खुनाच्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या २४ तासांत उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथे दिनांक १३/०२/२०२६ रोजी मनोज बापुराव शिंदे (वय ३८ वर्षे),रा. रा. मनोरमा कॉलनी,सह्याद्री चौक,अरुण हॉटेल मागे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचे वडील नामे बापूराव नामदेव शिंदे हे दाढी कटिंग करून येतो असे सांगून घरातून बाहेर पडले त्यानंतर ते परत न आल्याने  

दि.२४/०२/२०२६ रोजी मिसिंग दाखल करण्यात आली होती. परंतु दरम्यान एमआयडीसीतील साहेबां जवळील निर्जन डोंगर परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला होता.घटनेचे गांभीर्य लक्षात घेता एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. ११५/२०२६ भा.दं.वि. कलम १०३  (१)प्रमाणे दाखल करण्यात आला.प्रकरणाची उकल करण्यासाठी एम.आय.डी.सी.पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री.माणिक बी. चौधरी यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी विशेष पथक स्थापन केले.परिसरातील सीसीटीव्ही फुटेज संकलित करून त्याचे बारकाईने विश्लेषण करण्यात आले.तसेच गुप्त माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली.

तांत्रिक विश्लेषण व स्थानिक माहितीच्या आधारे सापळा रचून विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले व त्याच्या पालकांसमक्ष त्याची चौकशी करण्यात आली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, पोलीस उपनिरीक्षक विनोद परदेशी, पोलीस उपनिरीक्षक मनोज मोंढे, पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव,पोलीस अंमलदार राकेश खेडकर,राजू सुद्रिक,संदीप पवार,सचिन आडबल,नवनाथ दहिफळे,राजेश राठोड,ज्ञानेश्वर आघाव,सुरज देशमुख,सचिन हरदास,उमेश शेरकर,राहुल गुंडू यांच्या पथकाने केली आहे. एम.आय.डी.सी. पोलिसांच्या या झपाट्याच्या कारवाईमुळे गंभीर गुन्ह्याचा वेगाने उलगडा झाला असून, आरोपीला न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलिसांनी पुन्हा एकदा आपली तत्परता सिद्ध केली आहे.

No comments