adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

लासुरमध्ये उत्साहात साजरी वीर एकलव्य जयंती; ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक

 लासुरमध्ये उत्साहात साजरी वीर एकलव्य जयंती; ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक  विश्राम तेले चौगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) लासुर येथे दिनांक ...

 लासुरमध्ये उत्साहात साजरी वीर एकलव्य जयंती; ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक 


विश्राम तेले चौगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

लासुर येथे दिनांक १५ रोजी वीर एकलव्य जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. इंदिरानगर भागातील मरीआई चौकात विविध महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी बिरसा मुंडा, खाजा नाईक, शबरी माता, छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर गावातून ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. गावातील विविध सामाजिक चौकांमध्ये वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी पंपनगर येथे “वीर एकलव्य मित्र मंडळ, लासुर” या फलकाचे अनावरण सरपंच नर्मदाबाई भील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच वीर एकलव्य यांची सामूहिक आरती करण्यात आली.

या कार्यक्रमास किसान विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल पाटील, पोलीस पाटील जितेंद्र पाटील, माजी उपसरपंच लालचंद भिल, बळीराम पावरा, ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक पठाण, संजय पाटील, विकास वाघ, रमेश बारेला, विजय भिल, समाधान पवार, गोरख भील (मराठे), कमलबाई भिल, अर्जुन अहिरे, डॉ. नितीन अहिरे, गणेश भील, छोटू देवाजी, बापू भिल, सुनील ठाकरे, माजी सरपंच देवीलाल बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते. जयंतीनिमित्त गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून युवक-युवतींसह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

No comments